रावेर तालुका प्रतिनिधि- विनोद हरी कोळी
सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालयात प्राणीशास्त्र विभागामार्फत रक्तगट तपासणी शिबीराचे नुकतेच प्राचार्य डॉ. जे. बी. अंजने यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय सेवा योजनेच्या विध्यार्थ्यांकरिता आयोजन करण्यात आले.उदघाटन कार्यक्रमप्रसंगी आपल्याला रक्तगट माहित असणे खूप महत्वाचे आहे. [ads id="ads1"]
तातडीच्या प्रसंगी रक्तदाता होता येणं हे ही समाजकार्य असल्याच मत प्राचार्य डॉ. अंजने यांनी व्यक्त केले. या शिबिराचा जवळ जवळ 60 विदयार्थ्यांनी लाभ घेतला. रक्तगट तपसनीचे काम प्रणिशास्त्र विभागातील डॉ. पी. आर. महाजन व प्रा. अंकुर पाटील यांनी केले. [ads id="ads2"]
याप्रसंगी रासेयो चे कार्यक्रम अधिकारी डॉ. डी. बी. पाटील, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी डॉ. एस. बी. पाटील. आयक्वाक चे समन्वयक डॉ.एस.एन. वैष्णव, डॉ. एस. ए. पाटील, डॉ. जे. पी. नेहेते, प्रा. एच. एम. बाविस्कर, डॉ. एस. एस. साळुंके, प्रा. एस. बी. महाजन,एस पी उम्रीवाड, श्रेयस, अनिकेत, हर्षल पाटील व रासेयो चे अनेक विद्यार्थी उपस्थित होते.