जिल्हावर आढावा बैठक बोलवून जिल्हा आरोग्य अधिकारी यांचा काय सिद्ध करण्याचा प्रयत्न
यावल तालुका प्रतिनिधी :- मिलिंद जंजाळे
जळगांव जिल्ह्यातील अनेक ठिकाणी काय संपूर्ण जळगांव जिल्हात जरी म्हटले तरी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये पाहिजे त्या प्रमाणात औषध साठा नाही. असे असतांना सुद्धा आरोग्य केंद्रातील अधिकारी कर्मचारी मात्र जनतेला तोंड देऊन चांगल्या प्रकारे त्यांच्या परीने आरोग्य सेवा देत आहे पण जिल्हाच्या जिल्हा आरोग्य अधिकारी यांना प्राथमिक आरोग्य केंद्रातील अधिकारी व प्राथमिक आरोग्य केंद्रा अंतर्गत काम करणारे समुदाय आरोग्य अधिकारी व आरोग्य कर्मचारी वर्गाला आढावा बैठकीला बोलवून त्यांची गैरसोय करून फक्त कामाचा विचार करत आहे पण आरोग्य केंद्राना औषध पुरवठा मात्र शून्य दिसुन येत आहे हया मुख्यकार्यकारी अधिकारी व जिल्हा आरोग्य अधिकारी या गोष्टी कधी लक्ष देणार का असे जनते कडून मागणी केली जात आहे.[ads id="ads1"]
जळगांव जिल्हात एकुण 77 प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत आरोग्य अधिकारी आणि प्राथमिक आरोग्य केंद्रा अंतर्गत काम करणारे समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य सेविका, आरोग्य सेवक हे आरोग्य सेवेचे आपले काम बजावत आहेत परंतु वरिष्ठ अधिकारी वर्गाला त्यांच्या जिल्हावर बैठक बोलुन त्यांना फक्त काम करा काम करा जे कमी वजन बालके, गरोदर माता, कुष्ठरोग, क्षयरोग, साथरोग, असे अनेक विषय बाबत माहिती देण्याचे व त्यावर काम करण्यासाठी सांगत आहेत. मात्र औषध पुरवठा केला जात नाही का फक्त जिल्हावर आढावा बैठाका बोलवायच्या आणि नाहक प्राथमिक आरोग्य केंद्रातील अधिकारी आणि आरोग्य कर्मचारी वर्गाला वेठीस धरायचे काम जिल्हा आरोग्य अधिकारी काम करतांना दिसुन येत आहे.जिल्ह्यात तालुका स्थरावर तालुका आरोग्य अधिकारी आणि प्राथमिक आरोग्य केंद्राना वैद्यकीय अधिकारी दिले असतांना जिल्हा स्थरावर आढावा बैठक घेण्याचे कारण का ? आणि बैठकीला बोलुन सकाळी 11 ते संध्याकाळी 7 वाजे पर्यत वेठीस धरण्याचे कारण काय ? बैठकीसाठी बोलवले जाते मात्र बैठकीस जिल्हातील अधिकारी वर्गाकडून वेळे वाकडे बोलण्याचे कारण काय? कोणाचे कामे काय हे न ठरवता ज्याचे काम नाही त्यांना त्या कामांचे विचारणा केली जाते असे प्रकार जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या आढावा बैठकीतून सोमोर येतांना दिसुन येत आहे. तरी सुद्धा एक वरिष्ठ अधिकारी या दृष्टीने जिल्हा आरोग्य अधिकारी यांचा सम्मान केला जात आहे परंतु जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या ज्या प्रमाणे आढावा बैठकीस महत्व दिले जात आहे तितक्याच प्रमाणे प्राथमिक आरोग्य केंद्राना मुबलक औषध साठा उपलब्ध करून देण्याची ही नैतिकता दाखवावी कारण प्राथमिक आरोग्य केंद्राना मुबलक औषध साठा पुरवठा केला गेला तर रुग्णांना चांगल्या दरज्याची आरोग्य सेवा मिळू शकते आणि आरोग्य केंद्रातील अधिकारी समुदाय आरोग्य अधिकारी यांना जिल्हावर बोलवून वेठीस धरण्यात पेक्षा प्रत्येक तालुक्यावर तालुका आरोग्य अधिकारी दिले आहे प्राथमिक आरोग्य केंद्राना अधिकारी दिले आहे त्यांच्या स्तरावरून आढावा बैठकी घेतले गेल्या पाहिजे विनाकारण जिल्हावर बैठकी घेऊन आणि वैद्यकीय अधिकारी व समुदाय आरोग्य अधिकारी यांना सकाळी 11 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत वेठीस न धरता ग्रामिण भागातील जनतेला आरोग्य सेवा देण्याचे काम करू द्यावे विनाकारण वेठीस धरणे म्हणजे त्यांच्यावर दबाव तंत्र टाकण्याचे काम न करता ग्रामिण भागात चांगल्या प्रकारे आरोग्य सेवा पुरवण्याचे काम जिल्हा आरोग्य यांच्या कडून झाले पाहिजे त्यासाठी आरोग्य सेवा देण्यासाठी मुबलक असा औषध पुरवठा केला गेला पाहिजे जर आरोग्य केंद्रामध्ये पुरेसा औषध पुरवठा नसेल तर आरोग्य यंत्रणा कश्या प्रकारे काम करेल या कडे लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे आहे. फक्त आढावा बैठका घेऊन आणि प्राथमिक आरोग्य केंद्र उपकेंद्र यांना जिल्हा आरोग्य अधिकारी आणि मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्या कडून भेटी देऊन उपयोग नाही तर त्या प्राथमिक आरोग्य केंद्राना मुबलक असा औषध पुरवठा करण्यात कडे लक्ष देणे तितकेच महत्वाचे आहे. गेल्या अनेक वर्षांपासून प्राथमिक आरोग्य केंद्राना औषध पुरवठा नाही जेव्हा रुग्ण प्राथमिक आरोग्य केंद्राना जातात तेव्हा त्यानां सलाईन ची आवश्यक असतांना त्यांना सलाईन मिळत नाही. गोळ्या पाहिजे त्या प्रमाणात उपलब्ध नसतात तेव्हा त्या ठिकाणी काम करणारे अधिकारी कर्मचारी यांच्याशी काही लोक हुज्जत घालतात तरी देखील अधिकारी अश्या कठीण परिस्थिती चा सामना करून काम करीत असतो मात्र वरिष्ठ अधिकारी वर्गाला त्यांच्या आढावा बैठकी घेण्यात मोठे पण वाटते ही एक शोकांतिका आहे. ग्रामिण भागात आरोग्य सेवा देणे म्हणजे ग्रामिण भागात काम करणारे आरोग्य अधिकारी कर्मचारी वर्गाला किती सहन करावे लागते याचे जिल्हावरील वरिष्ठ वर्गाला गंभीर दिसुन येत नाही. [ads id="ads2"]
फक्त जिल्हावर ग्रामिण भागातील अधिकारी कर्मचारी वर्गाला वेठीस धरण्याचे काम जिल्हावर काम करणारे वरिष्ठ अधिकारी वर्गा कडून केला जात असल्याचे दिसुन येत आहे.ग्रामिण भागातील काम करणारे अधिकारी कर्मचारी यात काही महिला वर्ग सुद्धा मोठ्या प्रमाणात आहे आणि अश्या परिस्थिती जिल्हावर बैठक बोलुन त्यांना वेठीस धरून तब्बल उशिरा पर्यत बैठक घेणे कित पत योग्य आहे कोणाचे लहान मुले कोणाच्या घरी म्हातारे आई वडील सासू सासरे कोणाला दूर प्रवास करावा लागतो. जातांना रात्र झाली आणि अश्या वेळी त्यांचे बरे वाईट झाल्यास त्याला जबाबदार कोण राहील. असे करून वरिष्ठ अधिकारी वर्गाकडून ग्रामिण भागातील आरोग्य अधिकारी कर्मचारी यांना हेतू पुरस्कर त्रास देऊन नेमकं काय सिद्ध करायचं आहे. का जिल्हावर काम करणारे वरिष्ठ अधिकारी यांना वाटत कि आम्ही खुप काम करीत असतो असे त्यांच्या वरिष्ठ वर्गाला दाखवण्याचा प्रयत्न केला जात तर नाही ना? ग्रामिण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्राना मुबलक औषध पुरवठा नाही याच काय? असे अनेक प्रश्न सामान्य सुज्ञ नागरिकांन कडून केले जात असुन ग्रामिण भागात काम करणारे आरोग्य अधिकारी कर्मचारी यांना जिल्हावर बैठकी न बोलावता त्यांना वेठीस न धरता तालुका स्थरावर व त्यांच्या आरोग्य केंद्र स्तरावरून आढावा बैठक घ्यावे त्याच प्रमाणे लवकरात लवकर जिल्हातील प्राथमिक आरोग्य केंद्राना औषध पुरवठा करून चांगल्या प्रकारे रुग्ण सेवा देण्याचे काम मुख्यकार्यकारी अधिकारी व जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी या कडे जास्त प्रमाणात लक्ष केंद्रित करावे. अशी मागणी मोठ्या प्रमाणात केली जात आहे.


