रस्त्यात खड्डा कि खड्यात रस्ता बऱ्हाणपूर- अंकलेश्वर रस्त्याची काय सांगू व्यथा

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 

रस्त्यात खड्डा कि खड्यात रस्ता बऱ्हाणपूर- अंकलेश्वर रस्त्याची काय सांगू व्यथा

यावल तालुका प्रतिनिधी :- मिलिंद जंजाळे

यावल ते चोपडा बऱ्हाणपूर- अंकलेश्वर रस्ताचे पूर्ण पणे  तीन तेरा झालेले असतांना मात्र लोक प्रतिनिधी झोपा काढताना दिसुन येत असल्याचे दिसुन येत आहे अनेक वेळा बऱ्हाणपूर - अंकलेश्वर या महामार्गाच्या दुरुस्ती साठी अनेक वेळा काही सामाजिक कार्यकत्यांनी निवेदने दिली शाळकरी विद्यार्थी वर्गाने सुद्धा रस्ता रोको केले तरी तरी सुद्धा शासन मात्र झोपेचं सोंग घेतल्या सारखे दिसुन येत असुन या महामार्गने प्रवाशांना चालणे कठीण झाले असतांना हा रस्ता जिव घेणा बनला असुन संपूर्ण रस्त्यात खड्डेच खड्डे पडलेले आहेत.[ads id="ads1"]

   या रस्त्याने प्रवास करतांना रस्त्यात खड्डा कि खड्डयात रस्ता अशी परिस्थिती या महामार्गची बनलेली आहे मात्र खासदार ताई, आमदार मात्र फक्त पाहण्याच्या भूमिका घेतांना दिसत आहे त्यामुळे काय सांगू या रस्त्याची व्यथा अशी दैनिय परिस्थिती रस्त्याची झालेली दिसुन येत आहे.

बऱ्हाणपूर अंकलेश्वर हा महामार्ग असुन या रस्त्याने मोठ्या प्रमाणात राहदारी असते मोठ मोठ अवजड वाहने अनेक शहरे गावे जोडणारा रस्ता असुन लोक प्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, सामान्य नागरिक,या रस्त्याने ये जा करीत असतांना रस्त्यात खड्डेच खड्डे दिसुन येतात अनेक वेळा खड्डेमय झालेल्या महामार्गांवर काही नागरिकांना जिव ही गमवावा लागला कारण रस्त्याने प्रवास करावा तर कसा प्रवास करावा असा प्रश्न प्रवाशांना नेहमी पडत असतो परंतु प्रवाशी आपला जिव धोक्यात घालुन या प्रवास करीत असतात मात्र रस्ता पूर्ण पणे खराब झालेला असतांना  सुद्धा लोक प्रतिनिधी खासदार ताई व स्थानिक आमदार मात्र फक्त बघ्याची भूमिका घेतांना दिसत आहे. [ads id="ads2"]

  रस्ताने प्रवास करतांना प्रवाशांना खड्डे चुकवता चुकवता अपघाताच्या सामोरे जावे लागते कितना भीषण जिव घेणा बऱ्हाणपूर अंकलेश्वर महामार्ग बनलेला आहे तरी सुद्धा लोक प्रतिनिधी या रस्त्याकडे जाणून बुजून दुर्लक्ष करितांना दिसुन येत असुन अजून किती जिव जाण्याची वाट बघणार आहे हेच प्रवाशांना कळेनाशे झालेले आहे

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!