ऐनपुर प्रतिनिधी:- विजय एस अवसरमल
प्राथमिक आरोग्य केंद्र ऐनपुर येथे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सचिन भायेकर यांनी भेट दिली कामाची पाहणी करून काम पाहून समाधान व्यक्त केले व कर्मचारी यांचे कौतुक केले.[ads id="ads1"]
सविस्तर वृत्त असे की गेल्या दोन दिवसांपासून सतत सुरू असलेल्या पावसामुळे मध्य प्रदेशातील बैतूल जिल्ह्यातील मुसळधार पावसामुळे येथील तापी नदीला महापूर आला आहे ऐनपुर येथे हतनूर धरणाच्या फुगवट्याच्या पाण्यामुळे काही लोकांचे घरे व ऐनपुर निंबोल रस्ता त्याचप्रमाणे जिल्हा परिषद उर्दु प्राथमिक शाळा खोली प्राथमिक आरोग्य केंद्रात जाणारा रस्ता पाण्याखाली गेला असून या तापी नदीला आलेल्या महापुराचा फटका ऐनपुर,निंबोल,विटवा, निंभोरासिम,या गावाला बसला आहे या महापूरामूळे काही नागरिकांना स्थलांतरित करण्यात आले.[ads id="ads2"]
त्यांची राहण्याची व्यवस्था जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळा येथे करण्यात आले जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सचिन भायेकर यांनी स्थलांतरित नागरिक यांच्या आरोग्याच्या समस्या जाणून घेतल्या महापूर आल्याने साथीचे आजार फैलू नये त्याची काळजी कशी घ्यावी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ कुणाल पाटील यांना पाण्याखाली गेलेल्या भागातील नागरिकांचे सर्वेक्षण करण्याचे सक्त सुचना दिल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रत्येक विभागाची त्यांनी पहाणी केली प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी काम कशा प्रकारे करतात याची त्यांनी चौकशी केली आरोग्य केंद्राची प्रत्यक्ष पाणी केली कर्मचाऱ्यांचे निवासस्थानी भेट देऊन कर्मचारी यांच्याशी हितगुज केले तसेच कर्मचाऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या कर्मचाऱ्यांचे कामकाज समाधान कारक असल्याचे त्यांनी सांगितले



