रावेर तालुका प्रतिनिधी- विनोद हरी कोळी रावेर तालुक्यातील निंबोल या गावात गणपती मिरवणूक आणि विसर्जन सोहळा शांततेत पार पडला. पोलीस प्रशासनाचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. निंबोल गावात गणपती बसवण्याची वर्षानुवर्ष परंपरा चालत आहे 30 परंपरा सन 2023 मध्ये गणपती मिरवणूक सोहळा आणि विसर्जन सोहळा रावेर तालुक्यातील निंबोल या गावात सर्व मंडळाकडून यावेळी सुद्धा शिस्तीचे पालन करण्यात आले होते. [ads id="ads1"] निंबोल गावातील सर्वधर्मसमभाव म्हणून सर्व समाज स्तरावरून समाज बांधवांनी गणपती मिरवणुकीमध्ये सहभाग घेतला होता आणि गणपती मिरवणुकीपासून ते विसर्जनापर्यंत सोहळा सर्वांनी मिळून शांततेत पार पाडला. यावेळी सर्व समाज बांधव हजारोच्या संख्येने यावेळी उपस्थित होते.
रावेर तालुक्यातील निंबोल येथे बाप्पाला भावपूर्ण निरोप
शुक्रवार, सप्टेंबर २९, २०२३