पर्यावरण पूरक गणपती सजावट विजयी स्पर्धकांचा बक्षीस,प्रमाणपत्रासह गौरव

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे
पर्यावरण पूरक गणपती सजावट विजयी स्पर्धकांचा बक्षीस,प्रमाणपत्रासह गौरव


यावल  (सुरेश पाटील ) गणेशोत्सव साजरा झाल्यानंतरया वल येथे आश्रय फाउंडेशन व डॉ.कुंदन सुधाकर फेगडे मित्र परिवार आयोजित पर्यावरण पूरक गणपती सजावट स्पर्धेचे पारितोषिक वितरणाचा कार्यक्रमात सहभागी विजयी स्पर्धकांना बक्षीस प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.[ads id="ads1"]

   सदर स्पर्धा हि दि.२०सप्टेंबर ते २८ सप्टेंबर गुरुवार या दरम्यान घेण्यात आली होती या स्पर्धा मधे खूप मोठ्या संख्येने स्पर्धक सहभागी झाले होते.या स्पर्धेत सहभागी झालेल्या पहिल्या ३ स्पर्धाकांना बक्षीस व प्रमाणपत्र व सहभागी स्पर्धाकांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले,यात प्रथम पारितोषिक हे दिपक सोपान पाटील द्वितीय पारितोषिक हे संदिप धनशाम लोखंडे व तृतीय पारितोषिक कुणाल शरद जोगी यांनी मिळविले.[ads id="ads2"]

     सदर स्पर्धा हि पर्यावरण रक्षणाचे महत्त्व जागतिक पातळीवर पटवून देण्यासाठी आणि पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यासाठी,पर्यावरणाची गुणवत्ता वाढवणे,समस्या व संवर्धनाविषयी जागरुकता निर्माण करणे हे उदिष्ठ डोळ्यासमोर ठेऊन आयोजित केली होती.महाराष्ट्रात साजरा केल्या जाणाऱ्या घरगुती गणेश उत्सवाला अनेक वर्षांची परंपरा आहे.या उत्सवातून कौटुंबिक स्नेह जसा वृद्धिंगत होतो तसे सामाजिक बांधिलकीतून देश प्रेमाची भावना निर्माण होईल,देशाप्रती असणारी राष्ट्रनिष्ठा सामाजिक जाणीवा प्रखर करेल याची पक्की खुणगाठ बांधत लोकमान्य टिळकांनी ब्रिटिश सत्ते विरुद्ध जाज्वल्य राष्ट्रनिष्ठेचा अंगार फुलवण्यासाठी या उत्सवाला सार्वजनिक स्वरुप दिले. गणपती बाप्पा म्हणजे विघ्नहर्ता,संकट विमोचक आणी पराक्रमी योद्धा देखील. प्रत्येक शुभ कार्याची सुरुवात श्री गणरायाच्या "आधी वंदू तुज मोरया" या प्रार्थनेने केली जाते.कारण गणरायाचे पुजन म्हणजे मांगल्याची आरती. म्हणुनच जशी लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवातून पारतंत्र्याची लोकभावना जागृत केली आणि भारतीय स्वातंत्र्याचं रणशिंग फुंकलं,त्याच प्रमाणे वर्तमानात आपण सर्वानी बदलत्या हवामानाची,बदलत्या ऋतुचक्राची दखल घेण्यासाठी हा गणेश उत्सव पर्यावरणस्नेही साजरा करणं ही बदलत्या काळाची गरज आहे.इतकचं नव्हे तर केवळ गणेश उत्सव हाच फक्त पर्यावरण पूरक साजरा न करता वर्षभरातील सर्व सण,उत्सव पर्यावरण स्नेही साजरे करण्याचा संकल्प व निश्चय आपण करूया असे आव्हान आश्रय फाउंडेशन चे अध्यक्ष डॉ.कुंदन फेगडे यांनी केले या प्रसंगी सुरेश फेगडे, चंद्रकांत नेवे,संदिप लोखंडे, दिपक सोपान पाटील,उज्वल कानडे,यश पाटील कुणाल, जोगी,याज्ञिका योगेंद्र महाजन  इ उपस्थित होते.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!