रावेर ता.खिर्डी (सुवर्ण दिप वृत्तसेवा) द रावेर तालुका वंचित बहुजन महिला आघाडीची बैठक खिर्डी येथे सायंकाळी 6 .वाजता ऐनपुर रोडवरील बुद्ध विहारात वंचित बहुजन आघाडीच्या रावेर तालुका अध्यक्ष सौ. गायत्रीताई कोचुरे यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात संपन्न झाली.[ads id="ads1"]
या बैठकीला मार्गदर्शन करत असताना जिल्हा उपाध्यक्ष रफिक बेग यांनी वंचित बहुजन आघाडीची रूपरेषा ध्येय धोरण महिलांना समजून सांगितले. त्यानंतर वंचित बहुजन आघाडीच्या तालुकाध्यक्ष गायत्री ताई कोचुरे अध्यक्ष भाषणात म्हणाल्या की सर्व महिलांनी सक्षम बनवून वंचित बहुजन आघाडी या पक्षाला मतदान केले पाहिजे. महिलांना जे अधिकार हे डॉ. बाबासाहेब भीमराव आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून इथल्या तमाम भारतातील महिलांना दिले आहे असे त्यांनी महिलांना सांगितले.[ads id="ads2"]
वंचित बहुजन आघाडीचे रावेर तालुका अध्यक्ष बाळू शिरतुरे यांनी इथल्या महिलांना मार्गदर्शन करताना सांगितले की आताच काही दिवसापूर्वी रक्षाबंधन हा सण महिलांनी आपल्या भावाला राखी बांधून साजरा केला. आणि माझा भाऊ माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा राहुन माझे संरक्षण करेल. परंतु भारतातील तमाम एससी, एसटी, ओबीसी, मायनॉरिटी, या महिलांना जर कोणी अधिकार दिले असतील तर ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशाला असे संविधान दिले आहे की कोणत्याही जाती धर्माचा माणूस असो किंवा महिला असो शिक्षणाचे आणि नोकरीचे रिझर्वेशन या संविधानाच्या माध्यमातून दिले आहे. महिलांना प्रसूती रजा तसेच हक्काची रजा नोकरीमध्ये पन्नास टक्के जागा वडिलांच्या इस्टेटमध्ये भावाच्या बरोबरीने हिस्सा हे जर कोण्या भावाने दिले असेल तर तो भाऊ डॉ. बाबासाहेब आंबेडकर आहे. म्हणून येणाऱ्या निवडणुकीमध्ये श्रद्धेय बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांनी दिलेल्या उमेदवारालाच आपण मतदान केले पाहिजे. कारण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जे काम केले तेच काम श्रद्धेय बाळासाहेब तथा प्रकाशजी आंबेडकर हे करत आहे आणि इथल्या तळागाळातील वंचित समाजाला सत्तेमध्ये बसण्याचे काम वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला मतदान करून तुम्हाला सर्वांना करायचे आहे. आणि श्रद्धेय प्रकाशजी आंबेडकर यांचे हात बळकट करायचे आहे. असे वंचित बहुजन आघाडीचे रावेर तालुका अध्यक्ष बाळू शिरतुरे हे म्हणाले .
या बैठकीला सायरा कोचुरे, आशा जाधव, ललिता कोचुरे, सुमन भालेराव, इंदुबाई जाधव कमलबाई कोचुरे, आशा पारधे, निर्मला जाधव, शोभाबाई बिराडे, सुनिता ससाने, उषाबाई वाघ, इंदुबाई कोचुरे, गुंफा बाई वाघ, इंद्रावणी कोचुरे,पद्माबाईला लहासे, ताऊबाई जाधव , मनोज वाघ ,राजू इंगळे ,शुभम जाधव, आनंद जाधव ,कपिल कोचुरे ,रोहित जाधव ,करण कोचुरे ,अविनाश कोचुरे या बैठकीला बहुसंख्या महिला पुरुष उपस्थित होते . सूत्रसंचालन अरविंद गाढे यांनी केले .अजय तायडे यांनी आभार मानले .