यावल ( सुरेश पाटील ) वंचित बहुजन आघाडीचा यावल तालुक्यात झंझावात सुरु आहे यावल तालुक्यातील जामुन झिरापाडा या आदिवासी गावात वंचित बहुजन आघाडी शाखेचे अनावरण जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे याच्या हस्ते आज शुक्रवार दि.८ रोजी दुपारी 1:00 वा.मोठ्या उत्साहात संपन्न झाले. [ads id="ads1"]
शाखा उद्घाटन प्रसंगी जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे यांनी आदिवासी बांधवानी शिक्षणाची कास धरावी वंचित बहुजन आघाडी आदिवासी बांधवांना सर्वतोपरी मदत करणार वंचित बहुजन आघाडी शोषित,पिडीत,शेतकरी,कामगार,वंचित सर्व जाती धर्माच्या लोकांना न्याय मिळवुन देणारा पक्ष असल्याचे यावेळी सांगितले कामगार आघाडी जिल्हाध्यक्ष बालाजी पठाडे यांनी आदिवासी बांधवांनी आता बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली एक व्हा असे आवाहन केले.[ads id="ads2"]
साहिल तडवी,जिल्हा संघटक राजेंद्र बारी,यावल तालुकाध्यक्ष भगवान मेघे,भुषण साळुंके यांनी मनोगत व्यक्त केले
याप्रसंगी बाबुलाल पटेल, यावल तालुका महासचिव राजेश गवळी,बिलालसिंग बारेला,शरद अडकमोल,संतोष तायडे,बिलसिंग पवार,कामगार आघाडी यावल तालुकाध्यक्ष सुरेश बोदळे,बाबुलाल पटेल,प्रतिभाताई कोळी,रोहन निकम,भूषण भालेराव,रोहित वानखेडे,अमोल भालेराव,महेंद्र सोनवणे,अक्षय साळुंके,गोरख साळुंक,भानुदास महाजन, गौतम सपकाले,भावडू पाटील,बळीराम आण्णा कोळी,किरण साळवे, बुद्धभूषण तायडे,शीलवान अडकमोल,महेंद्र अडकमोल शाखा अध्यक्ष नरसिंग बारेला,जग्गु बारेला,प्यारासिंग बारेला,संभासिंग बारेला,आसाराम बारेला,रामदेवसिंग बारेला,किरण पावरा,हरसिंग बारेला,रेंजला बारेला सदस्य,रमेश जाधव,हमिद तडवी,शफि खान,तुराब तडवी आदि पदाधिकारी व जामुन झिरापाडा गावातिल कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुत्रसंचालन संतोष तायडे यांनी केले व आभार प्रदर्शन तालुकाध्यक्ष भगवान मेघे यांनी मानले.