कर्तव्यदक्ष अधिकारी मा. विशालजी लोंढे यांनी जन सामान्यांसाठी खुला केला आपला व्हाट्सअप नंबर

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

कर्तव्यदक्ष अधिकारी मा. विशालजी लोंढे यांनी जन सामान्यांसाठी खुला केला आपला व्हाट्सअप नंबर

 पुणे (सुवर्ण दिप वृत्तसेवा) :- काही अपवाद सोडले तर सरकारी अधिकारी आपला नंबर शक्यतो गोपनीयच ठेवतात.लासुर्णे (ता. इंदापूर) गावचे सुपुत्र पुण्याचे समाज कल्याण सहाय्यक आयुक्त मा. विशालजी लोंढे यांची काही दिवसांपूर्वीच कोल्हापूर येथून बदली झाली होती त्यानंतर त्यांनी पुण्याचा पदाभार स्वीकारताच कोल्हापूर प्रमाणे सर्वात आधी त्यांनी आपल्या कार्यालयाचे दरवाजे जन सामान्यांसाठी विना परवानगी खुले केले.[ads id="ads1"]

 या कार्याचे सर्वत्र कौतुक होत असतानाच आता त्यांनी त्यांच्या दौऱ्या दरम्यान तसेच महत्वाच्या बैठकीत असताना जन सामान्यांचे अर्ज व निवेदनाचे काम अडून राहू नये त्यांना विना अडथळा अर्ज व निवेदन करता यावेत याकरिता आपला व्हाट्सअप नंबर खुला केला असून त्यांनी आपल्या विविध सोशल मीडिया अकाउंट वरून जन सामान्यांसाठी आपला व्हाट्सअप नंबर शेअर केला आहे. [ads id="ads2"]

  या कामगिरी बद्दल त्यांच्यावर विविध स्तरातून कौतुकाची थाप पडत आहे.जन सामान्यांसाठी एवढ्या तळमळीने काम करणारा असा अधिकारी आम्ही आत्तापर्यंत तरी पहिला नाही.अशा जनमाणसातून प्रतिक्रिया येत आहेत.


  आपल्यासारख्या कर्तव्यदक्ष व समाजभिमुख, कार्यतत्पर अधिकाऱ्याची महाराष्ट्र राज्याला व देशाला खूप गरज आहे.-तर नरेंद्र देसले म्हणतात साहेब सलाम आहे आपल्या कार्याला आपली प्रेरणा घेऊन इतर जिल्ह्यातील अधिकारी यांनी बोध घ्यावा.अशा प्रकारच्या अनेक प्रतिक्रिया जनसामान्यांतून येत आहेत.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!