नांदगाव तालुक्यातील जामदरी येथे बसच्या अपघातात शाळकरी विद्यार्थ्यांसह प्रवासी जखमी

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे



नांदगाव प्रतिनिधी (मुक्ताराम बागुल) : नांदगाव तालुक्यातील जामदरी फाट्यावर नांदगाव एसटी डेपो आगाराची बसच्या अपघातात शाळकरी मुले व प्रवासी गंभीर जखमी झाले असल्याचे समजते.[ads id="ads1"] 

        याबाबत मिळालेल्या माहितीनुसार नांदगाव एसटी डेपो ची बस क्रमांक एम एच 14 बीटी 38 06  ही गिरणाड्यामकडून नांदगावकडे येत असतांना सदर बस जामदरी हॉटेल जवळ आली असता एसटी बसचे पाटे तुटल्याने हा अपघात झाला असावा असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. [ads id="ads2"] 

  या एसटी बस मध्ये अंदाजे 50 ते 55 प्रवासी होते. त्यामध्ये शाळकरी मुले आणि इतर प्रवाशांचा मोठ्या प्रमाणावर समावेश होता. या एसटी बस मध्ये शाळकरी मुले साकोरा व नांदगाव येत असतात. या बस अपघातामधील जखमींना नांदगाव येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!