जळगाव (सुवर्ण दिप वृत्तसेवा) माजी राज्यमंत्री नामदार आमदार तसेच (दिव्यांग कल्याण विभाग) महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष माननीय बच्चुभाऊ कडू, यांच्या उपस्थितीत दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगाचे दारी ,हा कार्यक्रम संभाजी राजे नाट्यगृह येथे घेण्यात आला. [ads id="ads1"] या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी, माननीय" बच्चुभाऊ हे होते .तसेच जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री, तथा पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील .प्रहार जनशक्ती चे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष ,माननीय अनिल भाऊ चौधरी. तसेच जळगाव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जळगाव महानगरपालिका आयुक्त. समाज कल्याण अधिकारी, व्यासपीठावर यांची विशेष उपस्थिती होती. यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद,यांनी दिव्यांग बांधवांचे विविध योजनांविषयी सविस्तर माहिती दिली. त्यानंतर बऱ्याचपैकी दिव्यांग बांधव यांना अनुदान वाटप करण्यात आले.[ads id="ads2"]
त्यानंतर प्रहार दिव्यांग संघटना जळगाव जिल्हा अध्यक्ष म्हणून जिल्ह्यातील सर्व तालुका स्तरा वरून चाळीसगाव तालुक्यातील राजू दादा जाधव यांचे नाव बच्चु भाऊ यांना सुचविण्यात आले. यावर चर्चा करू असे बच्चु भाऊ यांनी सांगितले. तर तरी राजू दादा जाधव यांना जिल्हास्तरावरून हिरवा कंदील मिळाला आहे. यावेळी रावेर तालुक्यातील प्रहार सेवक म्हणून विनोद कोळी यांनी 5% निधीबाबत तसेच 50 टक्के घरपट्टी माफ करणेबाबत तालुक्यातील काही ग्रामसेवक तसेच (BDO ) मॅडम यांचा कामचुकारपणा याची फाईल तसेच ग्रामीण रुग्णालय रावेर येथील ईसीजी सोनोग्राफी आणि एक्स-रे मशीन याची सुविधा बऱ्याच वर्षापासून नाही ती त्वरित मिळावी तसेच कर्मचाऱ्यांची संख्या वाढवून गरोदर मातेला सिजर करण्याची सुविधा या ग्रामीण रुग्णालयात मिळावी. आणि ग्रामीण रुग्णालयास (उपजिल्हा रुग्णालयाचा )दर्जा मिळावा .तसेच दोन वर्षाच्या कोरोना काळात परिवाराची आणि जीवाची परवा न करता कोरोना योद्धा म्हणून जेमतेम मानधनावर काम करणाऱ्या सर्व आशा सेविका यांना कायमस्वरूपी 30000 रुपये महिना अदा करण्यात यावा आणि कायमस्वरूपी शासन सेवेत समाविष्ट करण्यात यावे अशाप्रकारे सर्व कामांसंदर्भात सर्व मागण्या पूर्ण करण्यासाठी फाईल तयार करून यावेळी बच्चु भाऊ यांना प्रहार सेवक विनोद कोळी यांनी दिली. यावेळी कार्यक्रमात दिव्यांग लोकांची संख्या हजारोंनी होती.



