फैजपूर परिसरातील सर्व धर्मीयांनी सण आनंदाने साजरा करावा अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


 फैजपूर प्रतिनिधी (सलीम पिंजारी)

   फैजपूर हे शांतता प्रिय असल्याचा इतिहास आहे. या ठिकाणी शांतता कमिटीची मीटिंग घेण्याची गरज नाही. परंतु शासकीय नियम व एक औपचारिकता म्हणून आपल्या विचारांची देवाण-घेवाण, ओळख परिचय व्हावी या उद्देशाने येथे ही बैठक असल्याचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांनी आपल्या अध्यक्षीय  भाषणात सांगितले.  या विभागाचे प्रांत कैलास कडलक यांनी सांगितले की, गणेशोत्सव कार्यक्रमात व मिरवणुकीत प्रत्येक मंडळांनी लाऊड स्पीकरचा आवाज मर्यादेत ठेवावा. प्रत्येकाने नियमात राहून  उत्सव जल्लोषात साजरा करावा. गणेश मंडळाचे अध्यक्ष व सचिव यांच्या घराकडे स्पीकरचा आवाज ठेवावा म्हणजे तो मर्यादित आवाज राहील असेही त्यांनी यावेळी सुचविले. [ads id="ads1"]

 फैजपूर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर कुणाल सोनवणे यांनी आपल्या भाषणात सांगितले की, गणेशोत्सव, ईद-ए-मिलाद  सण व उत्सवात  गेल्या पाच ते दहा वर्षात या ठिकाणी एकही गुन्हा घडलेला नाही. आपल्यात असलेल्या समाजकंटकांना ओळखून पोलिसांना माहिती द्यावी जेणेकरून त्यांचा इतिहास बघून त्यांच्यावर कडक कारवाई करता येईल. फैजपूर शहरात सर्व धर्म एकत्र येऊन शांततेने व उत्साहाने सण साजरी कायदा व सुव्यवस्था पाळून सकारात्मक दृष्टीने गणेशोत्सव साजरा करावा असे हभप नरेंद्र नारखेडे यांनी आपल्या भाषणात सांगितले. विजेचे पोल व तारांच्या वर जाणार नाही अशा पद्धतीने गणेश मूर्तीची मिरवणूक फैजपूर शहरातून काढू नये. अशी सूचना महावितरणचे अभियंता विनोद सरोदे यांनी उपस्थित गणेशोत्सव पदाधिकाऱ्यांनी केली. [ads id="ads2"]

  धनंजय चौधरी यांनी शांततेसाठी यावल रावेर यांना लागेल ती मदत करण्यात येईल असे आमदार शिरीष दादा चौधरी यांच्या वतीने सांगितले. तत्पूर्वी सुरुवातीला एपीआय निलेश वाघ यांनी प्रास्ताविकात संपूर्ण माहिती दिली.  या बैठकीला यावल तहसीलचे अव्वल तहसीलदार संतोष विनंते, नगरपरिषद अधिकारी फारुकी साहेब, वीज वितरणचे विनोद सरोदे, पीएसआय मोहन लोखंडे, पीएसआय सय्यद मनुद्दीन, गोपनीयचे विजय चौधरी, योगेश दुसाने, राजेश बऱ्हाटे, रवींद्र मोरे, महेंद्र महाजन, चेतन महाजन, राहुल चौधरी, होमगार्ड यांचेसह  शांतता कमिटीचे सदस्य नरेंद्र नारखेडे, धनंजय चौधरी, कलीम मण्यार, अनंता नेहते, गोटू भारंबे, अनवर खाटीक, संजय रल, इकबाल दाढी, चंद्रशेखर चौधरी, शुभ दिव्य लाँनचे निलेश चौधरी, फैजपूर परिसरातील पोलीस पाटील, राजकीय पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, फैजपूर शहरातील पत्रकार अरुण होले, वासुदेव सरोदे, प्रा. उमाकांत पाटील, योगेश सोनवणे, सलीम पिंजारी,, राजू तडवी, विविध गणेश मंडळाचे पदाधिकारी यांच्यासह मान्यवर मंडळी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश गुरव सर यांनी केले.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!