नगरपरिषद,सार्वजनिक बांधकाम विभाग,वीज वितरण कंपनी यांच्या गैरहजेरीत शांतता समिती बैठकीत अतिक्रमणावर चर्चा

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 


पदाधिकारी,कार्यकर्त्यांकडून निष्क्रियतेचे खापर पोलिसांवर फोडण्याचा प्रयत्न

यावल ( सुरेश पाटील ) गणेशोत्सव निमित्ताने काल सोमवार दि.4 रोजी यावल पोलीस स्टेशन आवारात शांतता समितीची बैठक यावल तहसीलदार सौ.मोहनमाला नाझीरकर,डीवायएसपी कुणाल सोनवणे यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आली.या अति महत्त्वाच्या बैठकीत यावल नगरपरिषद,सार्वजनिक बांधकाम विभाग यावल, विक्रम कंपनी यावल यांचे अधिकारी किंवा त्यांचा प्रतिनिधी कोणीही उपस्थित नसल्याने गणेशोत्सव साजरा करताना येणाऱ्या अडचणी संदर्भात चर्चा करताना अनेक अडचणी आल्या. शांतता समिती बैठकीत यावल शहरातील अतिक्रमणासमोर अतिक्रमण होत असलेल्या अतिक्रमणाबाबत चर्चा झाली.[ads id="ads1"]

       शांतता समितीच्या बैठकीत प्रथम गणेशोत्सव साजरा करताना येणाऱ्या अडीअडचणी संदर्भात उपस्थितांकडून चर्चा करण्यात आली.

       शांतता समिती बैठकीत यावल शहरात व ग्रामीण भागात यावल पोलीस कार्यक्षेत्रात गणेशोत्सव साजरा करताना यावल पोलिस स्टेशन तर्फे यावल शहर व ग्रामिण भागातील गणेश मंडळांना सूचना करण्यात आल की, सालाबादप्रमाणे (सण 2023 मधील मंडळे ) श्री गणेश मंडळाची स्थापना करणारे मंडळांनी ONLINE FORM भरावे व सूचनांचे पालन करावे शहरातील गणेश मंडळांना नगरपरिषद NOC आवश्यक, ग्रामीण भागातील गणेश मंडळांना ग्रामपंचायत NOC आवश्यक,ONLINE FORM  भरताना आपल्या गणेश मंडळाचे 10 सदस्यांची नावे व मोबाईल नंबर यादी भरावी व त्या यादीची एक प्रत पोलीस स्टेशनमध्ये जमा करावी,[ads id="ads2"]

आपल्या गणेश मंडळाच्या आगमन व विसर्जनाच्या वेळी लावण्यात आलेल्या बँड,डीजे मालकाचे संपूर्ण नाव,बँडचे नाव,मोबाईल नंबर पोलीस स्टेशनला द्यावी,आपण भरलेला ONLINE FORM ची 1 प्रत यावल पोलीस स्टेशनला जमा करावी.विना परवानगी बसविण्यात येणारे गणेश मंडळावर रीतसर कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी.गणेश मंडळानी ONLINE FORM भरून यावल पोलीस स्टेशनला जमा करावे त्या नंतर फॉर्म स्वीकारले जाणार नाही. इत्यादी महत्त्वाच्या सूचना पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर यांनी दिल्या.

         गणेशोत्सवानिमित्त शांतता समितीची बैठक फार महत्त्वाची असते आणि या बैठकीत यावल शहरातील विविध अडीअडचणी संदर्भात चर्चा करण्यात येते परंतु यावल नगरपरिषद,सार्वजनिक बांधकाम विभाग यावल वीज वितरण कंपनी या कार्यालयांचे कोणतेही जबाबदार अधिकारी उपस्थित न राहिल्याने यावल तहसीलदार मोहनमाला नाझीरकर,डीवायएसपी कुणाल सोनवणे,पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर हे संयुक्तिकपणे गैरहजर राहणाऱ्या अधिकाऱ्यांना नोटीस काढून लेखी खुलासा मागवणार आहेत किंवा नाही याकडे आता संपूर्ण यावल शहराचे लक्ष वेधून आहे.

       यावल शहरात चौफेर सर्व ठिकाणी भर रस्त्यावर आणि रस्त्याच्या आजूबाजूला झालेल्या अतिक्रमणाच्या समोर पुन्हा दुसऱ्याचे अतिक्रमण सर्रासपणे यावल नगरपरिषद,सार्वजनिक बांधकाम विभाग यावल आणि पोलिसांच्या नाकावर टिचून सुरू आहे चिकन सेंटर आणि मटन विक्रेत्यांची दुकाने पाहिजे त्या ठिकाणी अनधिकृतपणे बेकायदा सुरू होत आहेत याकडे राजकीय पक्षाचे लोकप्रतिनिधी,पदाधिकारी, समाजसेवक कार्यकर्ते आणि काही संघटनांचे सुद्धा दुर्लक्ष होत असल्याने आणि ऐन वेळेला अतिक्रमण झाल्याच्या तक्रारी होत असल्याने संपूर्ण अतिक्रमणाचे खापर पोलिसांच्या डोक्यावर फोडण्याचा प्रयत्न सुरू आहे याकरिता लोकप्रतिनिधी, पदाधिकारी,कार्यकर्ते, समाजसेवकांनी यावल नगर परिषद,सार्वजनिक बांधकाम विभाग यावल आणि यावल पोलीस यांनी अतिक्रमण काढणे संदर्भात संयुक्त कारवाई तात्काळ करावी अन्यथा यावल शहरात फार मोठी अप्रिय घटना घडण्याची दाट शक्यता निर्माण झाली असल्याने अप्रिय घटना घडल्यास सर्व यंत्रणा जबाबदार राहणार असल्याचे सुद्धा यावल शहरात बोलले जात आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!