ऐनपूर प्रतिनिधी:- विजय एस अवसरमल
तालुक्यातील ऐनपूर येथे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ रावेर तालुका सभा उत्साहात संपन्न झाली.या सभेत तालुक्यातील पुरस्कार प्राप्त पत्रकारांचा सन्मान म्हणून सत्कार करण्यात आला.
सविस्तर वृत्त असे की, तालुक्यातील ऐनपूर येथे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ रावेर तालुका सभा उत्साहात संपन्न झाली.[ads id="ads1"]
त्या सभेतील नियोजित विषयप्रमाणे पुरस्कार प्राप्त जेष्ठ पत्रकार दिलीप वैद्य सर याना केळी विषयावर उत्कृष्ठ लिखाण केल्याबद्दल राष्ट्रीय पुरस्कार तसेच ज्येष्ठ पत्रकार राजीव बोरसे याना संगीत जीवन गौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल या दोन्ही पुरस्कार प्राप्त जेष्ठ पत्रकारांचा सत्कार व सन्मान करण्यात आला.
तसेच संघटनेत जास्तीत जास्त पत्रकार जोडण्यासाठी नियोजन करण्याचे ठरवले. तसेच उपस्थित पत्रकारांकडून सदस्य नोंदणी फॉर्म भरून घेण्यात आले.[ads id="ads2"]
याप्रसंगी जेष्ठ पत्रकार दिलीप वैद्य सर,पत्रकार राजीव बोरसे,ऐनपूर गावचे सरपंच अमोल महाजन,ग्रामीण जिल्हा अध्यक्ष संतोष नवले, ग्रा.जिल्हा कार्याध्यक्ष योगेश सैतवाल,जिल्हा प्रसिद्धी प्रमुख विनोद कोळी(शिवाभाई),ऐनपूर गावचे सरपंच अमोल महाजन,संघटनेचे रावेर तालुका अध्यक्ष प्रमोद कोंडे, उपाध्यक्ष प्रभाकर महाजन,सचिव इकबाल पिंजारी,कार्याध्यक्ष रवींद्र महाजन,संघटक विजय एस अवसरमल,राजेश चौधरी,सह सल्लागार विजय के अवसरमल,रमेश अवसरमल,अनिल आसेकर, ज्ञानेशवर महाजन,गिरीश नारखेडे,कैलास लवंगडे,दिपक श्रावगे,राजेंद्र सोनार,सुरेश पवार तसेच जिल्ह्याचे व तालुक्याचे पदाधिकारी व सदस्य व पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.विनोद पाल्ले आणि आकाश भालेराव यांची तालुका कार्यकारिणीत निवड करण्यात आली.सूत्र संचालन इकबाल पिंजारी यांनी तर आभार विजय एस अवसरमल यांनी केले.


