रावेर तालुका प्रतिनिधी (विनोद हरी कोळी)
जळगाव जिल्ह्यातील रावेर मधील ग्रामीण रुग्णालय येथे माहितीनुसार एक्स-रे मशीन उपलब्ध असून, चालू स्थितीत आहे. परंतु ,ती मशीन फक्त टीव्ही पेशंट या रुग्णांसाठीच वापरली जात आहे. म्हणून हाडांसाठी सुद्धा (एक्स-रे मशीन) चा वापर करण्यात यावा, अशी मागणी रुग्णांकडून होत आहेत.[ads id="ads1"]
2) ग्रामीण रुग्णालय रावेर येथे सोनोग्राफी मशीन उपलब्ध नसून, रुग्णालयात तपासणीसाठी येणाऱ्या गरोदर मातांची सोनोग्राफी ही( एन. आर. एच. एम.) मधून खाजगी डॉक्टरांचे नेमणूक करण्यात आलेली असून, त्यांच्याकडून आठवड्याच्या दर मंगळवार ला तपासणी करून घेतली जाते. हीच सुविधा रावेर येथील ग्रामीण रुग्णालय मध्ये उपलब्ध करून द्यावी. अशी मागणी गरोदर मातेकडून होत आहेत.[ads id="ads2"]
3) तसेच रावेर येथील ग्रामीण रुग्णालय मध्ये (इ.सी.जी.) मशीन उपलब्ध असून, ती बंद स्थितीत आहे. मग ही मशीन असून गोरगरिबांना त्याचा फायदा काय?असा सवाल सर्वसामान्य जनतेतून तसेच सर्व स्तरावरून होत आहे.
वर्ग -1 ते वर्ग -4 कर्मचाऱ्यांची संपूर्ण यादी संख्या एकूण 23 असून (इ.सी.जी.) मशीन रीडिंग घेण्यासाठी कोणी कर्मचारी पात्र नाही का? तसेच इ.सी.जी. मशीन लवकरात लवकर चालू करून गरीब रुग्णांना सेवा प्रदान करावी. तसेच गर्भवती महिलांची ग्रामीण रुग्णालय येथे सिजर ची सुविधा उपलब्ध नसून,गरीब महिलांना प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये 50 ते60 हजार रुपये कर्जबाजारी होऊन उसनवारी करून मोजून द्यावे लागतात,अशा परिस्थितीत त्या महिलां चे खूप हाल होतात. त्यामुळे ग्रामीण रुग्णालय रावेर येथे (सिजर ची) सुविधा त्वरित उपलब्ध करून द्यावी. अशी मागणी सर्व स्तरावरून होत आहेत. तसेच, ग्रामीण रुग्णालय मधील मेन इन्चार्ज डॉक्टर एन डी महाजन यांनी वरील बाबी कडे त्वरित लक्ष घालावे, अशी अपेक्षा रावेर तालुक्यातील सर्व स्तरा वरील गोरगरिबांकडून होत आहेत.


