रावेर तालुका प्रतिनिधी - विनोद हरी कोळी
रावेर तालुक्यातील जुने निंबोल येथे दिनांक 28/ 08 /2023 या रोजी एकाच दिवशी चार ठिकाणी घरफोडी करून चोरी करण्याचा प्रकार उघडकीस आला.[ads id="ads1"]
सविस्तर वृत्त असे की, जुने निंबोल, तालुका रावेर येथील, रहिवासी विनोद बाजीराव धनगर. वय 42, धंदा मजुरी , भाऊ संदीप धनगर .हे दोघे भाऊ दुसऱ्याची शेती विटवा शिवारात नफ्याने करून आपला उदरनिर्वाह चालवितात. हे दोघे भाऊ 28/0 8/ 2023 रोजी रात्री विटवा शिवारात शेतीमध्ये पाणी लावण्यासाठी गेले होते. त्यानंतर शेतातून परत घरी रात्री ठीक एक वाजेला आले. थकून आल्यावर शांत झोपून गेले. नंतर सकाळी विनोद धनगर यांचा मुलगा रुपेश धनगर, हा सकाळी ठीक4:30 वाजता रनिंग करण्यासाठी उठला तेव्हा, मुलाने आरडाओरडा करून घरच्यांना झोपेतून उठविले. तेव्हा मुलाचा वडील विनोद बाजीराव धनगर यांना समजले की, आपल्या घरात चोरी चोरी झाली आहे. सर्व सामान सैरावैरा पडला होता.[ads id="ads2"]
विनोद बाजीराव धनगर यांच्या घरात, चोरी लगबग रात्री दीड ते साडेचार दरम्यान झाली असावी ,चोरी झालेला सामान पुढीलप्रमाणे आहेत. एकूण दागिने व रोख रक्कम 16600, आणि 25 किलोचा एक गव्हाचा कट्टा असे चोरट्यांनी त्यांच्या घरातून वस्तू लांबविल्या आहेत.
विनोद धनगर यांनी आपली फिर्याद निंभोरा पोलीस स्टेशन येथे नोंदविली असता ,दिनांक 31/ 8 /2023 या रोजी चोरी केलेल्या सामानाचा पंचनामा करण्यासाठी निंभोरा पोलीस स्टेशन येथील हेड कॉन्स्टेबल अनिल साळुंखे ,यांनी पीएसआय(PSI) धुमाळ साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली, घटनास्थळी दाखल झाले .आणि सामानाची देखरेख करून पंचनामा केला.
त्यास मध्यरात्री निंबोल गावात लक्ष्मीबाई सदाशिव कोळी, यांचा मोबाईल आणि पाच हजार रुपये, हरी चिंधू कोळी यांचा पण मोबाईल ,एकनाथ चिंधू भिल्ल यांचा घरातील मोबाईल चोरी गेला.
यशोदाबाई चांभार यांचा मोबाईल, आणि सहा हजार रुपये, याप्रमाणे एकास मध्यरात्री पाच जणांच्या घरी चोर चोरी करून यशस्वीरित्या पसार झाले. दिवसा दिवस चोरीचे प्रमाण वाढत चालले आहेत त्यामुळे निंबोल गावात रात्रीच्या वेळेस कमीत कमी दोन पोलीस कर्मचारी, यांची त्वरित ड्युटी लावावी अशी मागणी गावकऱ्यांकडून होत आहेत. कारण निंबोल गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहेत तसेच चोरी करणारे आरोपींचा तपास लवकरात लवकर करावा, व त्यांना योग्य ती शिक्षा करावी, अशी मागणी फिर्यादी विनोद बाजीराव धनगर ,संदीप धनगर, लक्ष्मीबाई कोळी ,हरी कोळी, एकनाथ भिल्ल, यशोदाबाई चांभार, आणि सर्व गावकऱ्यांकडून होत आहेत.


