रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) : आगामी काळामध्ये येणाऱ्या सण, उत्सवाच्या मिरवणुकीमध्ये गैरवर्तन अजिबात खपवून घेतले जाणार नाही.तसेच सर्वानी पावित्र्य जपावे असे आवाहन फैजपूर उप विभागीय पोलीस अधिकारी डॉ.कुणाल सोनवणे यांनी केले. आगामी काळात येणाऱ्या सण, उत्सवांच्या पार्श्वभूमीवर रावेर येथील पोलीस ठाण्यात आयोजित केलेल्या बैठकीत ते मार्गदर्शन करताना बोलत होते. व्यासपीठावर रावेर पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक कैलास नागरे उपस्थित होते. [ads id="ads1"]
आगामी काळात मोठ्या प्रमाणावर हिंदू-मुस्लिम समाजाचे वेगवेगळे सण जसे की,गणेश जयंती, ईद ए मिलाद, श्रीकृष्ण जन्माष्टमी, जैन धर्मियांचा उत्सव व सण साजरे होणार आहेत. सर्वानी शांततेत व आनंदात उत्सव साजरे करून त्यांचे पावित्र्य जपावे असे आवाहन डॉ सोनवणे यांनी यावेळी केले. तसेच मिरवणूक काढताना पोलिसांनी घालून दिलेल्या नियमांचे प्रत्येकाने काटेकोर पणे पालन करणे अत्यावश्यक आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये गैरवर्तन व बेशिस्त पणा खपवून घेतला जाणार नाही. नियमभंग करणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा देखील डी.वाय.एस.पी. डॉ कुणाल सोनवणे यांनी दिला. यावेळी बैठकीला मोठया संख्येने समाजबांधव उपस्थित होते. [ads id="ads2"]
डीजे चालकांनी सुद्धा ठरवून दिलेले नियम पाळने बंधनकारक : पोलिस निरीक्षक कैलास नागरे
मिरवणुकीत डीजेचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. मात्र पोलिसांनी ठरवून दिलेल्या वेळेत डीजे चालकांनी मिरवणूक पूर्ण करावी, डीजेसाठी वापरण्यात येणारे वाहन सुस्थितीत व आरटीओ विभागाकडून तपासणी केलेले असावे. नादुरुस्त वाहन वापरू नये अशा सूचना डी.जे. चालकांना बैठकीत पोलीस निरीक्षक कैलास नागरे यांनी दिल्या. मिरवणुकीमध्ये विनाकारण व्यत्यय आणणाऱ्या डीजे चालकावर कारवाई करण्यात येईल असा इशारा त्यांनी यावेळी दिला आहे. बैठकीचे नियोजन रावेर पोलिस स्टेशनचे उप निरीक्षक राजेंद्र करोडपती, व पोलीस कर्मचारी पुरुषोत्तम पाटील यांनी केले.


