रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) रावेर येथे वंचित बहुजन आघाडी या पक्षाची महत्त्वपूर्ण बैठक सावदा रोडवरील नवीन रेस्ट हाऊस विश्रामगृह येथे दुपारी 12 वाजता रावेर तालुका अध्यक्ष बाळू शिरतुरे यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात संपन्न झाली.
या बैठकीला जिल्हा महासचिव दिनेश भाऊ ईखारे यांनी मार्गदर्शन करताना ते म्हणाले की वंचित बहुजन आघाडी च्या सर्व तालुका पदाधिकाऱ्यांनी निवडणुकीच्या तयारीसाठी सज्ज झाले पाहिजे कारण येणाऱ्या लोकसभा, विधानसभा निवडणुका केव्हाही लागू शकतात. त्यासाठी पक्षाने तयारीत असले पाहिजे . असे ते म्हणाले.
बैठकीचे अध्यक्ष बाळू शिरतुरे हे म्हणाले की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात भारत देशातील सर्व विरोधी पक्ष जवळजवळ 28, 29 . पक्ष एकत्र येऊन मुंबईमध्ये यांची बैठक 1 . सप्टेंबरला झाली. असून या इंडिया आघाडीच्या कोणत्याही नेत्याने वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धेय बाळासाहेब तथा प्रकाशजी आंबेडकर यांना या बैठकीचे निमंत्रण दिले नाही किंवा फोन सुद्धा केला नाही. यावरून असे लक्षात येते की या तमाम पक्षाच्या नेत्यांना बौद्ध समाजाचे मतदान चालते परंतु भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नातवाचा वंचित बहुजन आघाडी हा पक्ष चालत नाही किंवा या पक्षाला सोबत घेतले जात नाही म्हणून तमाम बौद्ध मुस्लिम ओबीसी समाजाने काँग्रेस ,राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाच्या उमेदवारांना मतदान करू नये. सर्वांनी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारालाच मतदान केले पाहिजे असा आपल्याला प्रचार आणि प्रसार करावा लागेल. असे अध्यक्ष भाषणामध्ये वंचित बहुजन आघाडीचे रावेर तालुका अध्यक्ष बाळू शिरतुरे म्हणाले .
वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष विनोद भाऊ सोनवणे शेवटी म्हणाले की येणाऱ्या काळामध्ये रावेर तालुक्याच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी जोमाने कामाला लागले पाहिजे गाव तेथे शाखा घर तेथे वंचिता कार्यकर्ता निर्माण झाला पाहिजे. गावोगावी वंचित बहुजन आघाडीच्या शाखा निर्माण करून प्रचार आणि प्रसार केला पाहिजे तसेच वंचित बहुजन आघाडीचे सभासद सुद्धा आपण झाले पाहिजे. जे पदाधिकारी काम करत नसतील अशा पदाधिकाऱ्यांना पदमुक्त करून त्यांच्या जागी नवीन कार्यकर्त्यांना चान्स देऊन पक्ष वाढीसाठी काम केले पाहिजे . असा सर्वांमध्ये ठराव करण्यात आला असून सर्वांनी प्रचार प्रसाद सुरू केला पाहिजे असे जिल्हाध्यक्ष आपल्या भाषणामध्ये म्हणाले .
या बैठकीला जिल्हा उपाध्यक्ष रफिक बॅग, जिल्हा संघटक याकूब शेख नजीर ता . उपाध्यक्ष सुरेश अटकळे, ता. सचिव अर्जुन वाघ, ता. उपाध्यक्ष सलीम शहा यासीन शहा, कंदर सिंग बारेला नरेंद्र करवले कैलास तायडे शंकर लहासे अमोल वाघ करण तायडे सुरमल बारेला राकेश बारेला करण तायडे अरविंद गाढे शिवा बेलदार जीवराम बेलदार दौलत अडांगळे किरण पोहेकर उपस्थीत होते.
या बैठकीचे सूत्रसंचालन कांतीलाल गाढे यांनी केले आणि आभार अजय तायडे यांनी मानले. या बैठकीला वंचित बहुजन आघाडीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.


.jpg)