धरणगाव प्रतिनिधी ( एस डी मोरेसर)
धरणगाव : शहरात ईद-मिलाद-उन-नबीच्या मुहूर्तावर मुस्लिम समाजाकडून मिरवणूक काढण्यात आली. हि मिरवणूकीचे पिल्लू मस्जिद परिसरात आगमन झाल्यानंतर ॲड. वसंतराव भोलाणे यांनी मिरवणुकी दरम्यान रथात विराजमान झालेले सय्यद इमाम साहेब व उपस्थित मान्यवरांचे शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत सत्कार करून एकतेचे प्रतीक म्हणून दर्शन घडविले.[ads id="ads1"]
सदरील मिरवणूक भडंगपुरा मशिदीपासून सुरू झाली आणि धरणी चौक, जैन गल्ली, पिल्लू मस्जिद, परीहार चौक, बेलदार गल्ली, तेली तलाव, लहान माळी वाडा, पाताळ नगरी, मस्जिद अली, खाटीक वाडा, कुरेशी मोहल्ला मार्गे परत भडंगपुरा येथे पोहोचली आणि मोठ्या जल्लोषात त्याची सांगता झाली. ईद मिलादुन्नबीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीत मुस्लिम समाजातील असंख्य बांधव सहभागी झाले होते. या मिरवणुकीचे ठिकठिकाणी फुलांची उधळण करून विविध धर्माच्या लोकांनी स्वागत केले त्यासह फरसाण, मिठाई व थंड पेय देखील वाटप करून पवित्र दिवसाच्या शुभेच्छा दिल्या. सदरील मिरवणुकीत मुस्लीम समूहातील बांधवांनी विवीध झेंडेसह हातात तिरंगा घेऊन आपल्या देशाप्रती जयघोष करीत घोषणा दिल्या. [ads id="ads2"]
शहरातील विविध भागात कमानी व स्वागत फलक उभारलेल्या दिसून आल्या. यावेळी घाटोडअली परिसरातील जेष्ठ पंच हाजी हाफिजोद्दिन यांनी सांगितले की, संपूर्ण भारतात आजचे महत्त्व आहे. ईद मिलादून नबीला विशेष महत्त्व असल्याचे सांगितले. हा दिवस मोहम्मद पैगंबर यांची जयंती म्हणून साजरा केला जातो. ज्याला ईद-ए-मिलाद असेही म्हणतात. त्याचप्रमाणे ॲड.व्ही.एस भोलाणे यांनी स्वागतप्रसंगी सांगितले की, ईद-ए-मिलादचा हा जन्मोत्सव पैगंबर मोहम्मद यांच्या जीवनाची आणि त्यांनी दिलेल्या शिकवणीची आठवण करून देतो. मोहम्मद पैगंबर यांचा जन्मदिनानिमित्त आनंदाचा उत्सवात सर्वांनी सहभाग घ्यावा असेही ॲड.भोलाणे यांनी सांगितले. याप्रसंगी कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिस निरीक्षक उद्धव ढमाले व त्यांचा संपूर्ण सहकाऱ्यांनी अनमोल सहकार्य केले.


