यावल (फिरोज तडवी) दि .२४ सप्टेंबर २०२३ रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती सभागृह येथे निळे निशाण सामाजिक संघटनेच्या रावेर / यावल तालुक्याची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे संस्थापक / अध्यक्ष आनंदभाऊ बाविस्कर तसेच जळगाव जिल्हा कार्यध्यक्ष सदाशिव निकम व जळगाव जिल्हा उपाध्यक्ष अशोक तायडे यांच्या उपस्थित बैठकीला सुरुवात करण्यात आली.[ads id="ads1"]
रावेर / यावल तालुक्यातीलनिळे निशाण सामाजिक संघटनेच्या रावेर / यावल तालुक्याची संयुक्त बैठक मोठ्या उत्साहात संपन्न .... समस्या जाणून घेऊन पदाधिकार्यांना सूचना देऊन समस्या कश्या सोडवायच्या या बद्दल सांगण्यात आले व जळगाव जिल्हा अध्यक्ष सतिश जी वाडे यांच्या सुचनेवरून ज्या पदाधिकार्यांनी संघटनेच्या नियमांच उल्लंघन करून शिस्तभंग केली त्यांना पदमुक्त करण्यात आले तसेच संघटनेत प्रवेश करणाऱ्या नविन कार्यकर्त्यांचे तालुका कार्यकारणीच्या वतीने स्वागत करण्यात आले.[ads id="ads2"]
या महत्त्वपुर्ण बैठकीत यावल तालुका प्रभारी युवक अध्यक्ष पदी इकबाल तडवी , रावेर तालुका उपाध्यक्ष पदी भास्कर वाघ , रावेर तालुका महिला आघाडी प्रभारी अध्यक्ष पदी आश्विनी अटकाळे , रावेर तालुका युवक संपर्क प्रमुख पदी समीर तडवी , यावल तालुका महासचिव पदी आबीद कुरेशी , रावेर शहर युवक अध्यक्ष पदी संकेत तायडे यांची निवड करून सत्कार करण्यात आले त्याप्रसंगी सुधिर सेंगमिरे , शरद तायडे , सागर बाविस्कर , शरद बगाडे , नारायण सवर्णे , विलास तायडे , भगवान आढाळे , अनिल इंधाटे , मांगीलाल भिलाला , अकिल खाँ , संजय तायडे , अमर तायडे , नलुताई सोनवणे , विदया बाविस्कर , कविताताई शिंदे , हसिनाताई तडवी तसेच अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


