रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) : आधार कार्ड व पॅन कार्ड लिंक करण्याचा बहाणा करून एका केळी ग्रुप चालकाच्या बँक खात्यातील सुमारे ९८ हजार रुपये काढून फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार शुक्रवारी घडला. रावेर पोलिसात(Raver Police Station)अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.[ads id="ads1"]
सविस्तर वृत्त असे की,रावेर तालुक्यातील नेहेते (Nehete Tal Raver Dist Jalgaon) येथील नितीन प्रकाश पाटील हे आपल्या गजानन केला ग्रुपमध्ये असताना अज्ञात व्यक्तीने त्यांना अॅक्सीस बँकेचा लोगो असलेली लिंक पाठवून लागलीच दुसऱ्या मोबाईल क्रमांकाने अज्ञात व्यक्तीने नितीन पाटील यांना फोन करीत सर तुमचा पॅन कार्ड व आधार कार्ड केवायसी करायचा असल्याचे सांगून फोन कट केला.[ads id="ads2"]
हा प्रकार पाटील यांच्या लक्षात येताच त्यांनी अॅक्सीस बँकेत फोन करून बँकेतील माझे खाते लॉक करण्याचे सांगितले मात्र या वेळात अज्ञात व्यक्तीने सुमारे ९८ हजार ६०० रुपये त्यांच्या खात्यातून काढून पाटील यांची फसवणूक केली. सदर घटनेप्रकरणी रावेर पोलिसात (Raver Police Station) अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.



