यावल(सुरेश पाटील)
यावल शहरातील विविध समस्या सोडविण्याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेना जनहित महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष चेतन आढळकर, जिल्हाध्यक्ष जमील देशपांडे व पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी जळगाव यांना निवेदन देऊन आंदोलनाचा इशारा दिला.
जिल्हाधिकारी जळगाव यांना दि.13 सप्टेंबर 2023 रोजी मनसे पदाधिकारी यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,यावल नगरपरिषदेला पुर्ण वेळ मुख्याधिकारी मिळावा. शहरात डेंग्यु सदृश परिस्थिती असुन सुध्दा धुर फवारणी करण्यात आली नाही. शहरातील गांवात जाण्याचा मुख्य रस्ता हा अतिशय खराब व दयनियअवस्था झाली असून तो दुरुस्त करण्यात यावा.
यावल शहरात हरीता सरीता ही नदी असून त्या नदीवर अतिक्रम झाले असून ते काढण्यात यावे.यावल शहरातील जुन्या विस्तारीत भागात गटार व रस्ते नसून ते तात्काळ करण्यात यावे.यावल शहरातील नुकतेच झालेले रस्ते अत्यंत नित्कृष्ठ दर्जाचे झाले.त्या सर्व रस्त्यांचे थर्ड पार्टीकडून ऑडीत करून चौकशी करावी.यावल शहरात विकसित भागात कोट्यावधी रुपये खर्चून नवीन पाण्याच्या टाकीचे बांधकाम करण्यात आले.त्यानंतर पाणीपुरवठा होण्यासाठी नवीन पाईपलाईन टाकण्यात आली.परंतु,ही पाईपलाईन टाकताना संबंधित ठेकेदाराने संबंधित यंत्रणेला टक्केवारी वाटप करून त्याच्या सोयीनुसार पाईपलाईनचे काम केल्याने संपूर्ण रस्त्यांचे गाड रस्त्यामध्ये रूपांतर झाले आहे.
त्यामुळे रस्त्यावर जागोजागी खड्डे निर्माण झाले,लोकांना वाहने चालवणे आणि पायदळ चालणे मुश्किल झाले आहे. त्यात पुन्हा नवीन पाईपलाईन मधुन पाणीपुरवठा होत नसल्याने पाईपलाईन दुरुस्तीसाठी पुन्हा जागोजागी खड्डे खोदण्यात आले.दुरुस्ती केल्यानंतर पडलेले खड्डे व्यवस्थित बुजविण्यात न आल्याने नागरिकांना आपली वाहने चालविताना आणि पायदळ चालताना मोठे अडथळे निर्माण होत आहे.
पायदळ चालताना तसेच शहरात प्रमुख रस्त्यावर आणि विकसित भागातील संपूर्ण रस्त्यांवर संबंधितांनी स्वतः अपघात होऊ नये म्हणून अनधिकृतपणे ठिकठिकाणी मोठमोठे गतिरोधक टाकले आले.गतिरोधक ही आवश्यक बाब असली तरी गतिरोधक साठी परवानगी आवश्यक असून नियमानुसार गतिरोधक झालेले नाहीत.तर काही ठिकाणी खोल खड्डे निर्माण झाले असून याकडे यावल नगरपरिषद बांधकाम शाखा अभियंता व पाणीपुरवठा विभाग प्रमुख तसेच मुख्याधिकारी यांचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे.दरम्यान,सदर कामाची टक्केवारी ठरलेली असल्याने बिल तात्काळ ठेकेदाराला अदा केले जाते. परंतु,काम कसे केले? काय केले? याची प्रत्यक्ष पाहणी बांधकाम विभाग का करत नाही? असे प्रश्न शहरवासियांकडून उपस्थित होत आहे.शिवाय आठवडे बाजारात मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले असून यामुळे संपूर्ण शहरात साथीच्या आजाराची दाट शक्यता निर्माण झाली आहे तसेच शहारत अनेकांनी नवीन इमारती व घरांची बांधकामे दुरुस्ती सुरू केल्याने भर रस्त्यावर बांधकाम साहित्य पडून असल्याने मोठे अडथळे निर्माण झाले आहे.
त्यामुळे नगरपरिषद विभाग, जळगाव यांनी यावल नगरपालिकेला प्रत्यक्ष भेट देऊन यावल शहरातील विविध भागाची पाहणी करून यावल नगरपालिकेची चुकीची व बोगस झालेल्या कामांची प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामे करून संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करावी अशी मागणी संपूर्ण यावल शहरातून होत आहे.
तसे न झाल्यास मनसे जन आंदोलन किंवा आमरण उपोषण करेल याची आपण नोंद घ्यावी असे जिल्हाधिकारी जळगाव यांच्याकडे दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे निवेदनावर मनसे जनहित महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष चेतन आढळकर,जिल्हाध्यक्ष जमील देशपांडे,यावल तालुका संघटक किशोर नन्नवरे,जिल्हा संघटक जनहित राजेंद्र निकम,जिल्हा अध्यक्ष ग्रामीण मुकुंदा रोटे, महानगर अध्यक्ष आशिष सपकाळे,ललित शर्मा यांनी स्वाक्षरी केली आहे.


