गणेश विसर्जनसाठी कृत्रिम तलाव आणि गणेश मूर्ती दान या अशास्त्रीय संकल्पना राबवू नये - हिंदू जनजागृती समिती

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे



यावल  (सुरेश पाटील ) ग्लोबल वॉर्मिंग सारख्या जागतिक संकटांचा सामना आज जगाला करावा लागत आहे त्यामुळे पर्यावरणाचे रक्षण करण्याचे महत्त्व आज सर्वांना लक्ष द्यायला लागले आहे मानवाला चांगले आरोग्य लाभण्यासाठी पर्यावरणाचे रक्षण करणे अत्यंत आवश्यक आहे तरी देखील अनेक विषयांमध्ये शासन प्रशासन यांच्याकडून अपेक्षित कृती होताना दिसून येत नाही त्यामुळे सामाजिक स्वास्थ धोक्यात आले आहे यावर सर्वांगीण आणि वास्तविक उपाय न योजता केवळ वर्षातून एकदा येणाऱ्या गणेश उत्सवाच्या निमित्ताने मूर्ती दान आणि कृत्रिम हौद यासारख्या मोहिमा राबवल्या जात आहेत याद्वारे होणारी श्री गणेश मूर्तींची घोर विटंबना थांबवण्यासाठी  यावल येथील तहसीलदार मोहनमाला नाझिरकर यांना हिंदु जनजागृती समिती व गणेश भक्तांच्या वतीने निवेदन देण्यात आले.[ads id="ads1"]

    या निवेदनाद्वारे यापुढे गणेश भक्तांकडून मूर्तिदान प्रशासनाने व अन्य शासकीय संस्थांनी घेऊ नये तसेच प्रतिवर्षी लाखो कोट्यावधी रुपये खर्च करून कृत्रिम तलाव तयार करण्यात येऊ नयेत. त्या जागी मूर्ती विसर्जनाविषयी वर्ष 2010 च्या केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सूचनेनुसार गणेश मूर्ती विसर्जनासाठी जलाशयामध्ये वा तळ्यामध्ये एका कोपऱ्याला लोखंडी तार्‍याच्या जाळीने बांधलेली दगडी भिंत तयार करून त्या ठिकाणी गणेश भक्तांना गणेश मूर्ती विसर्जन करण्यास सांगावे पूर्वापार धार्मिक प्रथा परंपरेनुसार नैसर्गिक जलक्षेत्रात मूर्ती विसर्जन करण्यास आठकाठी आणू नये व प्लास्टर ऑफ पॅरिस,रासायनिक रंग,कागदी लगदा आदींच्या जागी शाडूची माती आणि नैसर्गिक रंग यापासून बनवलेल्या गणेश मूर्ती बनवण्यासाठी शासनाने मूर्तिकारांना प्रोत्साहन आणि अनुदान द्यावे.[ads id="ads2"]

  प्रशासनाने प्रदूषणकारी कागदी लगद्याच्या मूर्तीची निर्मिती विक्री आणि विसर्जन यावर बंदी आणावी व शासनाने या मूर्तींना प्रोत्साहन देणे थांबवावे अशा मागण्या शासनाकडे करण्यात आल्या. निवेदन देताना  हिंदु जनजागृती समितीचे चेतन भोईटे,रितेश कोळी,हेमांशू धनगर,उज्वल कानडे,धिरज भोळे,सोनू महाजन उपस्थित होते व गणेश मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते असे दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात हिंदू जनजागृती समितीचे जळगाव जिल्हा समन्वय प्रशांत जुवेकर यांनी म्हटले आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!