यावल भुसावळ रस्त्यावर जीव घेणे मोठमोठे खड्डे आंधळ्या प्रशासनाला दिसून येत नाहीत..?
यावल ( सुरेश पाटील ) यावल भुसावळ रस्त्याचे सिमेंट काँक्रीटीकरण्याचे काम यावल सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे सुरू झाले आहे. भुसावळ कडे जाताना डाव्या बाजूच्या साईडचे बांधकाम सुरू आहे परंतु उजव्या बाजूने वाहतूक सुरळीत राहण्यासाठी ठेकेदारांने आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने वाहनधारकांसाठी पर्यायी व्यवस्था पाहिजे त्या प्रमाणात न केल्यामुळे,साईट पट्ट्यांना मुरूम किंवा खडीकरणाने मजबूत न केल्यामुळे आणि रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असल्याने जडवाहन धारकांना आणि फोर व्हीलर वाहनधारकांना त्या ठिकाणी मोठा त्रास सहन करावा लागत आहे यामुळे अनेक वाहने नादुरुस्त होऊन मोठा अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.[ads id="ads1"]
यावल भुसावळ रस्त्यावर जीव घेणे मोठमोठे खड्डे पडले असल्याने सर्व प्रकारच्या वाहनधारकांना मोठ्या अडचणी निर्माण झाल्या असून जीवित हानी होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे, पाऊस सुरू असताना कोणत्या ठिकाणी किती मोठा खड्डा आहे हे समजून येत नसल्याने फार मोठी अप्रिय घटना घडणार आहे ही वस्तुस्थिती यावल सार्वजनिक बांधकाम विभागाला आणि लोकप्रतिनिधींना दिसून येत नाही का..? त्यांना पर्यायी व्यवस्था दुरुस्ती करता येत नाही का इत्यादी अनेक प्रश्न चर्चेले जात आहेत.[ads id="ads2"]
कोणतेही सार्वजनिक बांधकाम सुरू करताना संबंधित ठेकेदाराला किंवा त्या विभागाला कामाच्या ठिकाणी बांधकामाबाबतचा माहिती फलक लावण्यात येतो, त्या फलकावर बांधकाम कोणत्या योजनेतून किती रकमेचे आहे इत्यादी तपशील देण्यात येतो आणि वाहतूक सुरळीत राहण्यासाठी सुरू असलेल्या कामाच्या बाजूला पर्यायी व्यवस्था करावी लागते त्याप्रमाणे या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाने आणि ठेकेदाराने पर्यायी व्यवस्था न केल्यामुळे त्या ठिकाणी वारंवार वाहतूक ट्राफिक जाम होत आहे यातून सार्वजनिक बांधकाम विभाग आणि ठेकेदार किती निगरगट्ठ आहे..? असे संपूर्ण यावल तालुक्यात बोलले जात आहे. खासदार,आमदार यांनी व विविध सामाजिक संघटनांनी आपले लक्ष केंद्रित करून नागरिकांच्या व वाहनधारकांच्या हितासाठी आणि जनतेचा आपल्यावर रोष येऊ नये म्हणून त्या ठिकाणी आणि यावल भुसावळ रस्त्यावरील पडलेले मोठमोठे जीव घेणे खड्डे तातडीने चांगल्या प्रतीच्या मटेरियलने दुरुस्त करावेत अशी जोरदार मागणी होत आहे.


