वंचित बहुजन आघाडी या पक्षाची गोलवाडे येथे बैठक उत्साहात संपन्न

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 

वंचित बहुजन आघाडी या पक्षाची गोलवाडे येथे बैठक उत्साहात संपन्न

रावेर ( सुवर्ण दिप वृत्तसेवा) रावेर तालुका वंचित बहुजन आघाडी या पक्षाची बैठक गोलवाडे येथे सायंकाळी 5 .30. वाजता वंचित बहुजन आघाडी चे रावेर तालुका अध्यक्ष बाळू शिरतुरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक उत्साहात संपन्न झाली.[ads id="ads1"]

या बैठकीला जिल्हा उपाध्यक्ष रफिक बेग यांनी सुचित करताना म्हणाले की वंचित बहुजन आघाडी हा पक्ष घराघरांमध्ये पोहोचला पाहिजे आणि आपल्या पक्षाच्या उमेदवाराला  मतदान करून आपला उमेदवार कसा निवडून येईल याची सर्वांनी आतापासून तयारी केली पाहिजे.[ads id="ads2"]

अध्यक्षीय भाषणामध्ये वंचित बहुजन आघाडीचे रावेर तालुका अध्यक्ष बाळू शिरतुरे हे आपल्या भाषणात म्हणाले की श्रद्धेय बाळासाहेब प्रकाश जी आंबेडकर हे रात्रंदिवस इथल्या वंचित समाजासाठी जीवाची पर्वा न करता गावोगावी जाऊन वंचित समाजाला जागृत करण्याचं काम करीत आहे बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्न पूर्ण करून इथल्या वंचित समाजाला सत्तेमध्ये बसवायचे आहे म्हणून आपण सुद्धा वंचित बहुजन आघाडी या पक्षाचा प्रचार आणि प्रसार आतापासून केला पाहिजे आणि आपल्या पक्षाच्या उमेदवाराला निवडून आणण्याची शपथ आपण घेतली पाहिजे. श्रद्धेय बाळासाहेब प्रकाश आंबेडकर एससी ,एसटी, ओबीसी कोणत्याही  समाजाचा प्रश्न तर उपस्थित झाला असेल तर ते धावून त्या समाजाला न्याय असा मिळून देता येईल ही मनाशी खूणगाठ बांधून त्या समाजाला न्याय मिळवून देत आहे . असे अध्यक्षीय भाषणामध्ये बाळू शिरतुरे म्हणाले .

या बैठकीला कैलास तायडे ,शिवा बेलदार, प्रदीप कोचुरे ,पंकज कोचुरे, मोहन सल्लोरे, आत्माराम इंगळे योगेश गायकवाड राजू वाघ ,अमोल वाघ, स्वप्निल इंगळे, विजय भालेराव, प्रकाश भालेराव, समाधान शेवाळे, सुपडू भालेराव ,दिलीप मेहंगे, रितेश भालेराव, सुनील गायकवाड ,समाधान भालेराव मुकेश इंगळे ,कविता बझर, राधा मेहंगे, बेबाबाई गायकवाड ,तसेच बहुसंख्य कार्यकर्ते महिला पुरुष या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीचे सूत्रसंचालन अरविंद गाढे यांनी केले तर आभार विजय भालेराव यांनी मानले .

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!