विवरे ता.रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) : जालना जिल्ह्यातील मराठा आंदोलनाला पाठिंबा दर्शवित रावेर तालुक्यातील विवरे ( Vivare Taluka Raver Dist Jalgaon)येथील अंकलेश्र्वर-बऱ्हाणपूर महामार्गावर विवरा परिसरातील शेकडो मराठा समाज बांधवांनी रास्ता रोको आंदोलन केले.[ads id="ads1"]
तसेच मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे, आंदोलकांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे त्वरीत मागे घ्यावे अशी मागणी यावेळी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. या आंदोलनामुळे दीड तास वाहतूक ठप्प झाली होती.
जालना जिल्ह्यातील आंतरवली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या लाठीमारचा निषेध व आंदोलकांना पाठिंबा दर्शवित विवरा व परिसरातील मराठा समाज बांधवांनी रास्ता रोको आंदोलन केले. [ads id="ads2"]
सकाळी नऊ वाजता आंदोलनाला सुरुवात झाली. विवरे (Vivare Tal Raver Dist Jalgaon) येथील सर्वच समाजातील नागरिक या आंदोलनात सहभागी झाले होते. दीड तास आंदोलन सूरु होते. त्यामुळे रस्त्याच्या दूरपर्यंत वाहनाच्या रांगा लागल्या होत्या. या आंदोलनात यादवराव पाटील, धंनजय चौधरी,पंकज बाबुराव पाटील, गोपाळ दत्तात्रय पाटील ,अमोल पाटील सुनील पाटील, किशोर पाटील यांच्यासह सर्वच समाजातील शेकडो नागरिक रस्त्यावर उतरले होते.यावेळी निंभोरा पोलिसांच्या वतीने चौक बंदोबस्त ठेवण्यात आला होता.