यावल तालुका प्रतिनिधी :- मिलिंद जंजाळे
तालुक्यातील साकळी येथे नुकतीच आगामी गणेश उत्सव निमित्त यावल पोलिस निरीक्षक राकेश माणगावकर यांच्या उपस्थित ग्रामपंचायत साकळी येथिल सभा गृहात शांतता बैठकीचे आयोजन करण्यात येऊन शांततेत खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली असता बैठकीत आदर्श गाव याकडे गावाने वाटचालीस महत्व देण्याचे आवाहन पोलिस निरीक्षक राकेश माणगावकर यांनी केले.[ads id="ads1"]
साकळी या गावात ग्रामपंचायत सभा गृहात पोलिस प्रशासनाच्या वतीने पोलिस निरीक्षक राकेश माणगावकर यांच्या अध्यक्ष तेखाली गणेश उत्सव च्या पाश्वभूमीवर शांतता बैठकीचे आयोजन करण्यात आले होते तेव्हा गावाकऱ्यांनी सन उत्सव साजरे करीत असतांना गाव आदर्श कसे बनेल याकडे लक्ष देऊन गणेश मंडळाने पर्यावरण पूर्वक देखावे,समाज उपयोगी देखावे, तरुण पिडीला प्रेरणा दायी असे व्याख्यानाचे आयोजन करावे जेणे करून आदर्श गावा बनविण्याकडे वाटचाल होईल व साकळी हे एक भविष्यात आदर्श गाव होईल असे आवाहन पोलिस निरीक्षक राकेश माणगावकर यांनी केले.[ads id="ads2"]
तर गणेश मंडळ यांच्या सहकाऱ्यांनी गणेश मंडळान्ना येणाऱ्या अडचणी मांडल्या त्याच प्रमाणे माझी जि. प. सद्य रविंद्र पाटील यांनी शांतता बैठकीत आपले मत व्यक्त करतांना गणेश उत्सव व येणारे प्रत्येक सन उत्सव साजरे करतांना खेळीमेळीच्या वातावरणात साजरे करावे व साकळी येथे सर्रास पणे विक्री होत असलेल्या पन्नी दारू चा बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी त्यांनी यावेळी केली. तेव्हा शांतता बैठकीत सय्यद तय्यब सय्यद ताहेर, मनू निळे, दिपक बडगुजर, पितांबर बडगुजर, आकाश पाटील, शेख सलीम शेख कलीम, नासीर खान नजीर खान, महेंद्र चौधरी, अशोक भिल, सुरेश बडगुजर, यांचा सह गणेश उत्सव मंडळाचे कार्यकर्ते व गावातील प्रतिष्टीत नागरिक, मुस्लिम बांधव यांच्या सह असंख्य नागरिक , त्याच प्रमाणे यावल पोलिस स्टेशन गुप्त विभागचे सुशील घुगे, होमगार्ड निरीक्षक विजय भोई, पोलिस शिपाई अलाउद्दीन तडवी, पोलिस मित्र नाना भालेराव आदी उपस्थित राहुन शांतता कमेटी ची बैठक शांततेत पार पडली.



