रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) : रावेर येथे आज दि. 24 ऑक्टोबर रविवार रोजी सकाळी 9 वाजता रावेर येथिल भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून दिप व धुप पुजा करून उपस्थितांनी अभिवादन करण्यात आले. यानंतर भारतीय बौद्ध महासभेचे केंद्रीय शिक्षक विजय अवसरमल , बौद्धचार्य भा.बौ.म. तालुका अध्यक्ष राजेंद्र अटकाळे, व बौद्धचार्य सदाशिव निकम यांनी त्रिशरण पंचशील घेतले. [ads id="ads1"]
कार्यक्रमास कामगार नेते दिलीप कांबळे,माजी नगरसेवक जगदीश घेटे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अनुसूचित जाती विभाग सचिव राजू सवर्णे,माजी नगरसेवक ऍड. योगेश गजरे, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा कार्याध्यक्ष पंकज वाघ,वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष बाळू शिरतुरे, प्रधान तंत्रज्ञ बी.सी.साळुंके, माजी मॅनेजर प्रकाश महाले, सामाजिक समता मंच कार्याध्यक्ष उमेश गाढे,आर पीआय जिल्हा उपाध्यक्ष एकनाथ गाढे,जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते उप. उपप्राचार्य संदीप धापसे ,प्रा. चतुर गाढे,ऍड. सुभाष धुंदले,वाहतूक निरीक्षक संदीप तायडे, रमण तायडेसर, माजी मुख्याध्यापक गोकुळ तायडे सर, माजी मुख्याध्यापक महेंद्र लोंढे, पुंडलिक कोंघे, ज्ञानेश्वर अटकाळे, रघुनाथ कोंघे, किशोर तायडे,भारतीय बौद्ध महासभेचे रावेर शहराध्यक्ष राहुलडी.गाढे, केंद्रीय शिक्षक विजय भोसले,प्राध्यापक रमेश वाघ, धनराज घेटे, वंचित बहुजन आघाडीचे अजय तायडे, संतोष तायडे, राजेश सूरदास, महेंद्र वानखडे, अजय तायडे, अनिल घेटे, अमर तायडे, संदीप वाघ, विकास अटकाळे, रमेश तायडे,बुद्धरत्न शिरतुरे यांचेसह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.


