रावेर (विनोद हरी कोळी) :आज दिनांक 23 ऑक्टोबर या रोजी रावेर तालुक्यातील कोळी समाजाच्या वतीने रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. जळगाव जिल्ह्यातील समस्त कोळी बांधवांना १९५० च्या कोळी नोंदीवरून समस्त जळगाव जिल्ह्यातील कोळी बांधवांना सरसकट जात वैधता प्रमाणपत्र मिळावे तसेच शासनाच्या परिपत्रकानुसार जात वैधता समिती जळगाव येथे नेमण्यात आली आहे परंतु ती समिती धुळे येथे आहेत ती समिती धुळ्यावरून कायमस्वरूपी जळगाव येथे लवकरात लवकर द्यावी तसेच जळगाव जिल्ह्यातील संबंधित कोळी बांधवांच्या मागण्या पूर्ण न झाल्यास महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असे जिल्हा कार्याध्यक्ष श्री सुभाष सपकाळे सर यांनी कोळी समाजासाठी आपली भावना व्यक्त केली. [ads id="ads1"] त्यानंतर रावेर येथील तहसीलदार बंडू कापसे यांना तसे निवेदन देण्यात आले . सदर निवेदनात म्हटले आहे की सन 1950 च्या पुराव्यानुसार परिपत्रक काढून (36 अ ) च्या नोंदी लावण्याचे आदेश रावेर तालुक्यातील समस्त तलाठी यांना देण्यात यावे त्यानंतर कोळी नोंदीवरून सरसकट समस्त कोळी बांधव यांना जात वैधता प्रमाणपत्र देण्यात यावे. तशी प्रत प्रांताधिकारी आणि जिल्हाधिकारी मुख्यमंत्री महोदय यांना देण्यात यावी असे निवेदनाद्वारे सुचविण्यात आले.[ads id="ads2"]
त्या ठिकाणी उपस्थित आदिवासी कोळी महासंघाचे जिल्हा महासचिव श्री मनोहर भाऊ कोळी ,कर्मचारी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष श्री दत्तात्रय तायडे सर , जिल्हा कार्याध्यक्ष श्री सुभाष सपकाळे सर , आदिवासी कोळी महासंघाचे रावेर तालुका अध्यक्ष श्री योगेश्वर कोळी तांदलवाडी, कोळी महासंघ युवक तालुकाध्यक्ष श्री विनोद कोळी ( शिवा भाईजी ), विनोद कोळी निंबोल, किशोर कोळी निंबोल, विशाल कोळी निंबोल, गणेश कोळी निंबोल,पृथ्वीराज जैतकर ऐनपूर,अनिल जैतकर ऐनपूर,पंडीत कोळी ऐनपूर,प्रविण कोळी कोळदा,मोहन कोळी कोळदा. खिरवळ सरपंच श्री गोपाळ कोळी , श्री रविंद्र सोनवणे , श्री संतोष सोनवणे तांदलवाडी , पत्रकार उमेश कोळी पातोंडी , विलास सपकाळे सुनोदा यांच्या उपस्थितीत देण्यात आले तरी रावेर तालुक्यातील सर्व समाज बांधवांनी वेळेवर सहपरिवारासह जास्तीत जास्त हजारोंच्या संख्येने उपस्थित राहुन रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.


.jpg)