यावल (सुरेश पाटील)
यावल तालुक्यातील अंजाळे येथील गट नं. 564/1 मध्ये 1113.07 ब्रास,गट नं. 552 मध्ये 29.68 ब्रास तसेच गट नं. 588 मध्ये 104.14 ब्रास असे एकूण मोजमाप अंदाजे 1246.89 ब्रास डबर जप्त केले आहे या जप्त अवैध साठ्याचा लिलाव करणे कामी दि.18/10/2023 पर्यंत निविदा मागविण्यात आल्या होत्या.परंतु लिलावाकामी निविदा प्राप्त न झाल्याने,सदर डबर साठयाचा ( जप्त गौण खनिजाचा ) पुनःश्च लिलाव दि.27/10 /2023 रोजी सकाळी 11:00 वाजता उपविभागीय कार्यालय, फैजपूर येथे अटी व शर्तीवर बंद लिफाफ्यातील निविदेद्वारे लिलाव करण्याचे निश्चित करण्यात आले आहे.[ads id="ads1"]
तरी लिलाव घेऊ ईच्छिणाऱ्या नागरीकांनी विहीत नमून्यातील निविदा दि.26/10/2023 रोजी सायंकाळी 5.00 वाजेपावेतो उपविभागीय कार्यालय,फैजपूर येथे जमा कराव्यात.विहीत नमून्यातील निविदा यावल तहसिल कार्यालयात तसेच फैजपूर येथील उपविभागीय कार्यालयात उपलब्ध आहेत. प्रत्येक निविदेची किंमत रक्कम रु.500/- असेल व ती निवेद्याची रक्कम परत मिळणार नाही असे उपविभागीय अधिकारी कैलास कडलग यांनी दिलेल्या आदेशानुसार यावल तहसील कार्यालयाकडून माहिती मिळाली.


