यावल येथील जे.टी.महाजन इंग्लिश स्कूलमध्ये नवरात्रीचा उत्सव संपन्न

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


यावल (सुरेश पाटील)

यावल येथील व्यास शिक्षण मंडळ संचलित जे.टी.महाजन इंग्लिश स्कूल मधे नवरात्री उत्सवानिमित्त दांडिया सेलिब्रेशन कार्यक्रम मोठ्या साजरा करण्यात आला.[ads id="ads1"]

       शाळेचे प्राचार्य रंजना महाजन मॅडम व प्राचार्य डॉ.किरण खेट्टेसर यांनी सरस्वती पूजन करून व प्रतिमेस हार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात केली.    

    कार्यक्रमाचे सूत्रसंचालना नंतर मुलांनी गरबा रास खेळून आपला आनंद व्यक्त केला. अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात भारतीयांच्या आदिम वस्त्रपरंपरेषी नातं सांगत घागरा,लेहेंगा,चोळी,ओढणी ई.लोकप्रिय पोशाख मुलींनी परिधान करीत तसेच मुलांनी आपल्या आवडत्या वस्त्र संस्कृती,संस्कृतीचे प्रदर्शन करून नवरात्री उत्सव कार्यक्रमाचा मोठ्या उत्साहात शिस्तबद्ध पद्धतीने आनंद घेतला.[ads id="ads2"]

  या कार्यक्रमाचे नियोजन शाळेचे प्रवेशक राजश्री लोखंडे व गौरी भिरूड मॅडम यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेच्या शिक्षका वैशाली अडकमोल मॅडम यांनी केले व मुलांना नवरात्र उत्सवाचे महत्व व माहिती प्रियांका फेगडे मॅडम यांनी दिली त्याबरोबर कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर,कर्मचारी आदिनी परिश्रम घेतले अशा प्रकारे नवरात्री उत्सव कार्यक्रम आनंदात,उत्साहात,शांततेत पार पडला.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!