फिरोज तडवी : यावल तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा दिवाणी न्यायाधीश सो. व न्यायदंडाधिकारी यावल प्रथम वर्ग श्री. सुनिल बा. वाळके यांच्या मार्गदर्शनानुसार जनजागृतीपर कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी प्रमुख वक्ते समांतर विधी सहायक श्री. शशिकांत वारुळकर हे होते.[ads id="ads1"]
त्यांनी आपल्या मनोगतात म्हटले की, संसर्गजन्य रोगांमध्ये इलाजापेक्षा ही रोगाच्या प्रादुर्भावापासून स्वतः ला वाचवण्यासाठी काळजी घेणे आवश्यक असते यासाठी जनजागृती करणे हेच महत्त्वाचे असते. शासन स्तरावर अनेकानेक योजना राबविल्या जात असतात परंतु नागरिकांमध्ये जागरूकता नसेल तर या योजना यशस्वी होत नाहीत म्हणून अशा प्रकारचे कार्यक्रम घेणे गरजेचे असते.[ads id="ads2"]
या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी डॉ. मयूर चौधरी होते.प्रास्ताविक सदांशीव यांनी केले तर उपस्थितांचे आभार नानासाहेब घोडके यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी यावल कोर्टाचे कर्मचारी श्री. सी. एम. झोपे, एस. एस. झांबरे, दर्पण आर. पाटील तसेच समांतर विधी सहायक हेमंत फेगडे आणि अजय बढे यांचे सहकार्य लाभले