रावेर तालुका प्रतिनिधि- विनोद हरी कोळी
ऐनपूर येथील सरदार वल्लभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालयात गांधी रिसर्च फाउंडेशन जळगाव तर्फे गांधी विचार संस्कार परीक्षा २०२३ चे आयोजन दि-१२/१०/२०२२ रोजी करण्यात आले होते.[ads id="ads1"]
या परीक्षेत महाविद्यालयातील ४६ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.परीक्षेसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जे .बी. अंजने यांनी मार्गदर्शन केले.संस्थेचे संचालक श्री.एन.व्ही.पाटील यांनी परीक्षा केंद्रावर भेट दिली. परीक्षेचे समन्वयक म्हणून प्रा. डॉ.पी.आर. गवळी यांनी काम बघितले .परीक्षेसाठी पर्यवेक्षक म्हणून प्रा.डी.ए.कोळी व प्रा.अक्षय महाजन यांनी कार्य केले.प्रा प्रदिप तायडे,प्रा नरेंद्र मुळे व शिक्षकेतर कर्मचारी श्रेयस पाटील यांनी परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी सहकार्य केले.