यावल(सुरेश पाटील)
काल शुक्रवार दि.६ ऑक्टोंबर २०२३ रोजी आठवडे बाजाराच्या दिवशी किरकोळ कारणावरून झालेल्या भांडणात यावल येथे प्रभाकर आनंदा धनगर वय 55 राहणार बोरावल धनगरवाडा यावल व रामा केशव ढाके यांची दि.६ ऑक्टोबर ६ रोजी संध्याकाळी बोरावल गेटवरील एका चहाच्या टपरी समोर भांडण झालं त्यात प्रभाकर आनंदा धनगर यांच्या पोटात रामा केशव ढाके यांने चाकूचा वार केला त्यात प्रभाकर धनगर हा गंभीर जखमी झाला तर प्रभाकरने रामा डाके याच्या डोक्यावर व हातापायावर काठीने जबर वार केल्याने तोही गंभीर जखमी असून दोघांवर यावल ग्रामीण रुग्णालयात उपचार करून अगोदर प्रभाकर धनगर याला जळगाव सिविल ला पाठवण्यात आले.
तर रामा डाके याला सुद्धा प्रकृती अस्वस्थामुळे जळगाव येथे हलवले प्रभाकर धनगर यांच्या नातेवाईकांनी दिलेल्या तक्रारीवरून रामा डाके याच्या विरोधात यावल पोलिसात रात्री गुन्हा दाखल करण्यात आला व रामा डाके यांचीही फिर्यादीनुसार प्रभाकर धनगर यांच्यावर क्रॉस कंप्लेंट करण्यात आली रात्री उशिरा प्रभाकर धनगर औषधोपचार घेत असताना जळगाव सिव्हिल मध्ये मयत झाला यासंदर्भात यावल पोलिसात खुनाचे गुन्ह्याची कलम वाढवून गुन्ह्यात नोंद करण्यात आले तर रामा डाके याची सुद्धा प्रकृती खराब असल्याचे सांगण्यात येते.सदर घटनेमुळे यावल शहरात एकच खळबळ उडाली असून बोरावल गेट परिसरात दुकाने बंद ठेवण्यात आलेली आहेत.[ads id="ads2"]
यावल पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर यांच्या निगराणी खाली फौजदार मोरे व मुजफ्फर खान तसेच सहाय्यक फौजदार पाचपोळे व सहकारी यांनी मयताच्या व जखमी रामा डाके यांच्या घराकडे बंदोबस्त ठेवलेला आहे मयत प्रभाकर धनगर हे माजी नगरसेवक सुधाकर धनगर यांचे मोठे भाऊ असून त्याच्या पश्चात पत्नी दोन मुले दोन मुली अशा परिवार आहे तर जखमी रामा डाके याच्या पश्चात पत्नी व दोन मुली असा परिवार आहे.
बोरावल गेट परिसरात नेहमीच गावठी हातभट्टी पन्नीची दारू उघड्यावर विकली जाते कोणी बोलायला गेलो तर त्याच्या घरासमोरील वस्तू लोखंडी पलंग असो किंवा घाट असो किंवा घरगुती सामान असो हा निश्चित दोन दिवसात गायब होतो एवढी दारू विक्रेत्यांची या परिसरात दहशत आहे पोलीस येतात रेड टाकून जातात पुन्हा एक तासांमध्ये दारू विक्री होते मात्र दारूचा कायमस्वरूपी या परिसरात बंदोबस्त होत नाही. कदाचित पोलीस यंत्रणा कुठेतरी कमी पडते,यावल पोलिसाचा वचक राहिलेला नाही,वस्तुस्थिती लक्षात न घेता क्रॉस कंप्लेंट नोंदी करण्याचा धडाका सुरू असल्याने यावल शहरात अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे.काही घटनांमध्ये गुन्हेगार प्रवृत्तीचे गुन्हे व मारहाण करून पोलीस स्टेशनला क्रॉस कंप्लेंट करण्यासाठी ओळख परिचय आणि हितसंबंधातून सर्वात प्रथम हजर होतात.यात मात्र पोलीस जाणून बुजून ज्या ठिकाणी घटना घडली आहे त्या ठिकाणचे सीसीटीव्ही कॅमेरे फुटेज तपासता चौकशी न करता नोंदी करून घेत आहे याबाबत सुद्धा यावल शहरात अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे.