सावदा प्रतिनिधी (युसूफ शाह)
सावदा :- रावेर तालुक्यात असलेल्या सावदा येथे इत्तेहाद एज्युकेशन सोसायटीद्वारे संचालित ॲंग्लो उर्दू हायस्कूल मध्ये संचालक तथा शाळा समिती चेअरमन अक्रम खान अमानुल्ला खान वय.४८ या दुर्योधन प्रवृत्तीच्या पुरुषाने १३ वर्षीय शाळकरी बालिकेचा शाळेत वाईट हेतूने अतिशय घृणास्पद व कीळसवानी पद्धतीने विनयभंग केल्याप्रकरणी तो गेल्या २ महिन्या पासून जिल्हा कारागृहात बंदिवान असताना यादरम्यान त्यांनी जामीन मिळावा म्हणून भुसावळ सत्र न्यायालयात दुसऱ्यांदा अर्ज दाखल केला होता.[ads id="ads1"]
सदर जामीन अर्जावर दि.१६/१०/२०२३ रोजी न्यायालयात आरोपीचे वकील,फिर्यादीचे वकील सह सरकारी वकील यांनी आपापल्या पद्धतीने जोरदार युक्तिवाद केला.यानंतर आज १७ ऑक्टोंबर रोजी संशयित आरोपी अक्रम खान अमानुल्ला खान याचा जामीन अर्ज अखेर भुसावळ सत्र न्यायालयाचे न्यायाधीश यांनी अखेर फेटाळून लावला,असून त्या संशयिताचा पुन्हा मुक्काम जिल्हा कारागृहात आहे. [ads id="ads2"]
फिर्यादी पिढीतेच्या वतीने रावेर तालुक्यातील मोठा वाघोदा येथील ॲड.सुबहान शेख व ॲड.प्रितम मेढ यांनी काम बघीतले तर संशयित आरोपी अक्रम खान तर्फे जळगाव येथील ॲड.अकिल इस्माईल यांनी काम पाहिले.