रावेर तालुका प्रतिनिधी - विनोद हरी कोळी.
आज दिनांक 28/ 10 /2023 या रोजी ग्रामपंचायत निंबोल तालुका रावेर येथे सकाळी ठीक ९:३० वाजेला महर्षी वाल्मिकी जयंती निमित्त आद्यकवी रामायण वाल्मिकी यांची नेहमीच्या विधीनेमानुसार पूजा केली.[ads id="ads1"]
त्या ठिकाणी उपस्थित समस्त कोळी समाजाच्या वतीने ग्रामपंचायत कर्तव्यदक्ष सरपंच श्री संजय विश्वनाथ पाटील यांच्या हस्ते कोळी समाजाचे आराध्य दैवत महर्षी वाल्मिक यांची पूजा करून पुष्पहार घालण्यात आला. त्यानंतर निंबोल गावातील समस्त कोळी बांधवांनी नेहमीप्रमाणे महर्षी वाल्मिक यांची पूजा केली. [ads id="ads2"]
त्याप्रसंगी तेथे उपस्थित मान्यवर सरपंच संजय पाटील, उपसरपंच अशोक पाटील ,ग्रामपंचायत सदस्य राहुल गुरुजी ,पोलीस पाटील योगेश पाटील, प्रभाकर पाटील ,ईश्वर पाटील ,क्लार्क दिगंबर धनगर, भगवान चिकटे, किशोर कोळी ,सुभाष कोळी ,विनोद कोळी, भागवत कोळी, संजय कोळी, मच्छिंद्र कोळी, निमीचंद कोळी ,विशाल कोळी, गणेश कोळी नवीन निंबोल ,गणेश कोळी जुने निंबोल ,नारायण कोळी, वैभव कोळी ,रोहन कोळी, श्रीराम कोळी, विकी कोळी , इत्यादी कोळी समाज भरपूर संख्येने त्या ठिकाणी उपस्थित होता.