ऐनपूर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) : येथील सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना एककातर्फे दि. ३१ ऑक्टोबर २०२३ या दिवशी सरदार पटेल जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले. [ads id="ads1"]
उपस्थित सर्वांनी एकता दिवसाच्या निमित्ताने एकात्मतेची शपथ घेतली. त्यांनंतर ‘एकता दौड' चे आयोजन करण्यात आले. यात उपस्थित सर्व प्राध्यापक, प्रध्यापाकेतर कर्मचारी व रा. से. यो. स्वयंसेवक यांनी सहभाग नोंदविला. [ads id="ads2"]
यावेळी राष्ट्रीय सेवा योजना चे विभागीय समन्वयक डॉ. जयंत नेहेते तसेच रा. से. यो. कार्यक्रम अधिकारी डॉ. डी. बी. पाटील उपस्थित होते. सदर कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी महाविद्यालाचे प्राचार्य डॉ. जे. बी. अंजने यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व प्राध्यापक, प्रध्यापाकेतर कर्मचारी यांनी प्रयत्न केले.


