ताप्ती पब्लिक स्कूल जिल्हा स्तरीय अबॅकस व स्पेलिंग स्पर्धा

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 

ताप्ती पब्लिक स्कूल जिल्हा स्तरीय अबॅकस व स्पेलिंग स्पर्धा

अरसलान व अरहान तडवीस सर्वप्रथम बक्षीस

प्रतिनिधी रावेर/मुबारक तडवी

भुसावळ येथील सभागृहामध्ये सप्रह स्कॉलर्सच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय अबॅकस व स्पेलिंग कॉम्पिटीशन मधील विजयी विद्यार्थ्यांचा बक्षीस वितरण समारंभ ताप्ती पब्लिक स्कूलच्या सभागृहात रविवारी आयोजित करण्यात आला होता.[ads id="ads1"]

सदरील स्पर्धेत पैकीच्या पैकी गुण पटकावून विशेष प्राविण्य मिळवणाऱ्या कु. अरहान अशफाक तडवी (बालगट) आणि कु. अरसलान अशफाक तडवी (मोठागट) यांचा पालकांसोबत सन्मान अहमदाबाद येथील इस्रोचे वैज्ञानिक भरतभाई चनेरिया, रमण सायन्स टेक्नॉलॉजी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. चंद्रमौली जोशी व एपीजे अब्दुल कलाम नॅशनल कौन्सिल ऑफ यंग सायंटिस्टचे व्हॉइस चेअरमन सुनील वानखेडे यांच्या हस्ते करण्यात आला.[ads id="ads2"]

या वेळी वैज्ञानिकांनी विद्यार्थ्यांसोबत संवाद साधताना गेल्या दशकामध्ये इसरो या संस्थेच्या वतीने करण्यात आलेल्या विविध मोहिमांविषयी मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमाला गटशिक्षणाधिकारी किशोर वायकोळे, ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मोहन फालक,  प्राथमिक शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष विनोद पाटील, प्रहार शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष सलीम शेख, डीसीपीएस चे जिल्हाध्यक्ष संदीप पाटील, युनिव्हर्सल पब्लिक स्कूलच्या संचालिका प्रतिभा तावडे, डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्रिन्सिपल अनघा पाटील, ताप्ती पब्लिक स्कूलच्या प्रिन्सिपल नीना कटलर, ग. स. सोसायटीचे संचालक योगेश इंगळे, प्राथमिक शिक्षक सोसायटीचे संचालक प्रदीप सोनवणे, माध्यमिक शिक्षक पतपेढीचे अध्यक्ष गोपाळ पाटील, सरदार वल्लभ भाई पटेल इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्रिन्सिपल पूजा बोरोले, सतीश नवलखे, वैशाली कुलकर्णी, वर्षा लोखंडे आदींची उपस्थिती लाभली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेाठी सप्रह स्कॉलर्स च्या जिल्हाप्रमुख अमिता जोशी, संचालक सपना सोनार, राहुल सोनार यांनी परिश्रम घेतले.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!