अहो मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब जन्म प्रमाणपत्रावर स्वाक्षरीचे अधिकार कोणाला आहेत..?

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 


यावल ( सुरेश पाटील ) अहो मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब जिल्हा परिषद जळगाव यावल तालुक्यात जन्म प्रमाणपत्रावर स्वाक्षरी करण्याचे अधिकार कोणाला दिले आहेत..? हे जरा जनतेच्या माहितीसाठी आपण जाहीर करणार का..? असे यावल तालुक्यात बोलले जात आहे.[ads id="ads1"]

        याबाबत सविस्तर माहिती अशी की तालुक्यातील साकळी येथील शंकर शामराव यांचा जन्म यावल तालुक्यातील साकळी येथे दि.२५ / ९ /१९७१ रोजी झाला आहे. आणि शंकर शामराव चौधरी यांच्या जन्माबाबत ऑनलाईन तसेच यावल पंचायत समितीचे दप्तरी अधिकृत नोंद आहे. आणि तसा दाखला सही शिक्कासह यावल पंचायत समिती सहाय्यक गटविकास अधिकारी यांनी दि.१७ ऑक्टोंबर २०२३ रोजी दिला होता आणि आहे.[ads id="ads2"]

         परंतु यावल पंचायत समितीच्या नमुना क्र.१० जन्म नोंदवही वरून जन्म प्रमाणपत्रावर स्वाक्षरी करण्यासाठी यावल पंचायत समितीत संपूर्ण अधिकाराचा वापर करणारे आणि जिल्हा परिषद पासून यावल पंचायत समिती गटविकास अधिकारी व संबंधित अधिकारी,कॉन्ट्रॅक्टर, ठेकेदार,लोकप्रतिनिधी यांना विश्वासात घेऊन सोयीनुसार कार्यालयीन कामकाज करून घेणारे आणि साकळी ग्रामपंचायत प्रशासक यांच्यासह साकळी ग्रामपंचायत ग्रामसेवक यांनी जन्म प्रमाणपत्रावर स्वाक्षरी करण्यासाठी स्पष्ट नकार देऊन आम्हाला अधिकार नाही असे सांगितले,त्यामुळे शंकर चौधरी हे जन्म प्रमाणपत्रावर स्वाक्षरी करण्याचा हुद्दा नमूद असलेल्या अधिकाऱ्यांकडे गेल्यावर सुद्धा स्वाक्षरी न केल्यामुळे यावल तालुक्यात अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे त्यांनी यावल तहसीलदार यांची प्रत्यक्ष भेट घेऊन माहिती घेतली असता जन्म प्रमाणपत्रावर स्वाक्षरी करण्याचे अधिकार हे साकळी ग्रामपंचायत सरपंच,ग्रामसेवक  प्रशासक यांनाच असल्याचे सांगितले.

       प्रशासकाने जन्म प्रमाणपत्र घेणाऱ्यास एक दिवस चांगले फिरवा फिरव केले उशिराने का होईना ( तालुक्यातील एका कॉन्ट्रॅक्टरच्या ओळख परिचयाने आणि आपल्यावर कारवाई होऊ शकते म्हणून ) नंतर स्वाक्षरी केली.तरी जळगाव जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी जन्म प्रमाणपत्रावर स्वाक्षरी कोणी करायची..? हे जनतेच्या माहितीसाठी आणि आपल्या अधिकारी,कर्मचाऱ्यांच्या माहितीसाठी जाहीर करावे तसेच साकळी ग्रामपंचायत प्रशासक,ग्रामसेवक या दोघांनी  जन्म प्रमाणपत्रावर प्रथम स्वाक्षरी करण्यास का नकार दिला याची चौकशी करावी असे यावल तालुक्यात बोलले जात आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!