यावल ( सुरेश पाटील )
जळगाव येथे जिल्हाधिकारी कार्यालया समोर गेल्या १० ऑक्टोंबर पासून आदिवासी कोळी समाजामार्फत अन्नत्याग आंदोलन सुरु आहे आदिवासी कोळी समाजाला अनुसूचित जमाती प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र मिळण्याबाबत अनेक अडचणी येतात त्यावर कायमस्वरूपी उपाय योजण्यासाठी रास्त मागण्यासाठी सदर सत्याग्रह सुरु आहे.[ads id="ads1"]
या प्रसंगी भेट देऊन कोळी समाज बांधवांच्या समस्या व मागण्या जाणून त्यांना आश्रय फॉउंडेशन तर्फे जाहीर पाठींबा दिला.या प्रसंगी काही उपोषण कर्ते अत्यवस्थ झाले त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली देशातील प्रत्येक समाजाला त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी विश्वनेते तथा पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांचे धोरण असून राज्यातील सर्व समाजांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याबाबत आमचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व आपले जिल्ह्याचे नेते गिरीषभाऊ महाजन यांनी सांगितले आहे त्यामुळे कोळी समाजाला लवकरच न्याय मिळेल ही अपेक्षा त्यांनी आंदोलन कर्त्याजवळ व्यक्त केली.