आगामी काळातील सर्व स्तरावरील निवडणुका,पक्ष संघटना बांधणी तसेच जळगाव जिल्हा (रावेर लोकसभा)कार्यकारणी नव्याने गठित करणे संबंधी वंचित बहुजन आघाडीच्या सर्व आजी-माजी पदाधिकाऱ्यांसोबत नूतन जिल्हा निरीक्षकांनी संवाद साधत पक्ष संघटना ही एका विचाराने चालते पण त्यासोबत त्यात बांधणी व यंत्रणा महत्त्वाची असते ती निर्माण करणे ही पदाधिकारी म्हणून पक्षातील प्रत्येकाची जबाबदारी असून जळगाव जिल्ह्यात पक्ष अधिक बळकट करत पक्षाचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वात आगामी निवडणुकांना ताकदीने सामोरे जा,असे मत आपल्या मनोगतात व्यक्त केले.[ads id="ads2"]
याप्रसंगी वंचित बहुजन महिला आघाडीच्या जिल्हा महासचिव वंदना आराख,जिल्हा उपाध्यक्ष मीरा वानखेडे,वंचित बहुजन कंत्राटदार संघटनेचे प्रकाश सरदार,पश्चिमचे जिल्हाध्यक्ष प्रमोद इंगळे, पश्चिमचे युवा जिल्हाध्यक्ष जितेंद्र केदार,युवा आघाडीचे जिल्हा सचिव शाहरुख शहा,मोहन पाटील,संघटक मनीष वाकोडे,बेबो किन्नर,जगन गुरचळ, माजी जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे,सद्दाम कुरेशी,विनोद कोंगे,रावेर तालुकाध्यक्ष बाळू शिरतुरे,बोदवड तालुकाध्यक्ष सुपडा निकम,जामनेर तालुकाध्यक्ष सचिन सुरवाडे,यावल तालुकाध्यक्ष भगवान मेघे,भुसावळ तालुकाध्यक्ष प्रमोद बावस्कर,भुसावळ शहराध्यक्ष गणेश जाधव,बबन कांबळे,रुपेश साळुंखे यांच्यासह जिल्ह्यातील शेकडो आजी-माजी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.



