फैजपूर नगरपरिषद कर निरीक्षकला फक्त एकच फलक दिसल्याने त्याचे होणार ऑपरेशन ?
यावल ( सुरेश पाटील ) तालुक्यातील फैजपुर नगरपरिषद हद्दीत अनेक ठिकाणी बेकायदा फलक लावलेले असताना आणि यापुढे सुद्धा लावले जाणार असल्याची माहिती फैजपूर नगरपरिषद कर निरीक्षकाला असताना सुद्धा बिना परवानगीने लावलेल्या फक्त एका फलक मालकावर द्वेष भावनेतून कारवाई केल्याने नगरपरिषद कार्यक्षेत्रात कर निरीक्षक यांच्या भूतकाळ,वर्तमान व भविष्य काळातील संशयास्पद कारवाईचे राजकीय व सामाजिक स्तरातून ऑपरेशन केले जाणार असल्याचे बोलले जात आहे.[ads id="ads1"]
माहितीचा अधिकार कायदा सन 2005 अधिनियम, तरतुदी,नियम आणि कलमान्वये फैजपूर नगरपरिषद कर निरीक्षक तथा जन माहिती अधिकारी वसुली विभाग यांनी दि.२६ ऑक्टोबर २०२३ रोजी यावल येथील मनोज देविदास बारी यांना दिलेल्या पत्रावर नियमानुसार आपले नाव नमूद केलेले नाही. तसेच दि. १/४/२०२३ ते दि.२७/४/२०२३ या कालावधीत फैजपूर नगरपरिषद हद्दीत बिना परवानगी बोर्ड लावलेल्या मालकाची माहिती उपलब्ध नाही असे स्पष्ट नमूद केलेले आहे.[ads id="ads2"]
उपविभागीय अधिकारी फैजपूर भाग फैजपूर यांचे कडील ( कर निरीक्षकाने तारखेचा उल्लेख न केलेल्या ) गणेश उत्सव 2023 बाबत शहरात झेंडे पताका बॅनर वगैरे बिना परवानगी लावणाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत तथापी गणेश उत्सव काळात १० दिवसासाठी वैद्यकीय क्षेत्रातील एका डॉक्टरने फैजपूर येथील छत्री चौकात बिना परवानगीने बोर्ड लावल्यामुळे नोटीस बजावलेली आहे असे म्हटले आहे.
नोटीस बजावणे हा कार्यालयीन कामकाजाचा, कर्तव्यदक्षतेचा,कौतुकास्पद कामगिरीचा भाग असली तरी फैजपुर नगर परिषदेच्या संपूर्ण कार्यक्षेत्रात बिना परवानगीचा फक्त एकच फलक होता का.?
या आधी यावल तालुक्यातील व फैजपूर परिसरातील अनेक लोकप्रतिनिधी,समाजसेवक, आणि विविध संघटनांच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी जे फलक,बॅनर,बोर्ड लावले होते त्याची रीतसर परवानगी कर निरीक्षकाने दिली होती का..? आणि यापुढे सुद्धा जाहीर फलक लावले जाणार आहेत याची रीतसर परवानगी घेतली जाणार आहे का..? फैजपुर नगरपरिषद कर निरीक्षकाला फलक बोर्ड बॅनर मुळे फैजपूर शहर विद्रूपीकरण झाल्याचे दिसणार आहे का..? त्यावेळेस फैजपूर नगरपरिषद कर निरीक्षक हा बिना परवानगी फलक लावणाऱ्या मालकांना नोटीस काढणार आहे की सुप्रीम कोर्टाच्या आदेशाची पायमल्ली करणार..? याकडे आता संपूर्ण यावल तालुक्याचे लक्ष वेधून आहे तसेच कर निरीक्षक यांच्या कार्यक्षेत्रातील व्यावसायिक खाजगी उद्योग धंद्यातील संबंधितांकडील कर आकारणी कर कामकाजातील कायदेशीर ऑपरेशन केले जाणार असल्याचे बोलले जात आहे.
प्रांताधिकारी यांच्याकडून कारवाईची अपेक्षा..!
फैजपुर नगरपरिषद कर निरीक्षक यांनी दि.२६ ऑक्टोबर २०२३ रोजी दिलेल्या पत्रात नमूद केल्यानुसार दि. १ एप्रिल २०२३ ते २७ सप्टेंबर २०२३ या कालावधीत बिना परवानगीने रकमेबाबत माहिती निरंक असल्याचे सुद्धा नमूद केले आहे.त्यानुसार या कालावधीत म्हणजे ५ महिन्याच्या कालावधीत कर निरीक्षकाला आपल्या कार्यक्षेत्रात बिना परवानगीचा एकही फलक दिसून आला नाही का..? तसेच सुप्रीम कोर्ट व औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशानुसार शहराचे विद्रूपीकरण होऊ नये म्हणून अनधिकृत फलक बॅनर जे लावले गेले,अनधिकृत फलक लावले जात आहेत, आणि यापुढे सुद्धा लावले जातील त्याबाबत कर निरीक्षकाने कारवाईत सातत्य ठेवण्याबाबत आणि एकाच व्यक्तीवर द्वेष भावनेतून कारवाई केल्याने कर निरीक्षकावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी संपूर्ण यावल तालुक्यातून होत आहे.


