शैक्षणिक उपक्रमातून विद्यार्थ्यांचा विकास साध्य होतो
विवरे ता रावेर (संजय मानकरे) : तालुक्यातील विवरे येथील शिक्षण विकास मंडळ विवरे संचलित श्री ग गो बेंडाळे प्राथमिक विद्यामंदिर येथे शैक्षणिक साहित्य वाटपाचा कार्यक्रम पार पडला शिक्षण विकास मंडळाचे सचिव आदरणीय प्रा शैलेश रमेश राणे यांच्या मातोश्री स्वर्गवासी सुलोचनाताई रमेश राणे यांच्या स्मरणार्थ इयत्ता नर्सरी ते चौथी च्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. [ads id="ads1"]
लहानपणापासूनच विद्यार्थ्यांना बक्षिसाच्या रूपाने अभ्यासात गोडी निर्माण करता येते ,त्यांच्या बालमनावर याचा सकारात्मक परिणाम होतो त्यांच्या कलागुणांचा विकास होवून प्रेरणा मिळते , संस्थेमध्ये कार्य करीत असतांना शाळेचे ,संस्थेचे काही देणे लागते या उदात्त हेतूने सरांनी हे बक्षिसे दिली .या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय रमेश माधव पाचपांडे होते विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा यासाठी हा उपक्रम प्रेरणादायी ठरेल असे मत त्यांनी व्यक्त केले.[ads id="ads2"]
या प्रसंगी प्रा शैलेश राणे , माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री पी एच वायकोळे सर, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ हर्षाली बेंडाळे मॅडम पर्यवेक्षक श्री आर टी कोल्हे सर ,उपशिक्षक वारके सर.ग्रंथपाल श्री पी पी मिसर ,तसेच , सर्व प्राथमिक विभागाच्या शिक्षिका भगिनी, उपस्थित होत्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रिया कुंवर मॅडम यांनी तर आभारप्रदर्शन शुभांगी राणे मॅडम यांनी केले या उपक्रमाचे संस्थेचे आदरणीय अध्यक्ष, उपाध्यक्ष, चेअरमन,व्हा चेअरमन सर्व संचालक मंडळ, माध्यमिक विभागाचे सर्व शिक्षक बंधुभगिनी, शिक्षकेतर कर्मचारी बंधु व पालक वृंदानी कौतुक केले आहे



