स्वच्छांजलीतून महाविद्यालयाला स्वच्छ बनवू - प्रभारी प्राचार्य डॉ ए आय भंगाळे

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे



फैजपूर प्रतिनिधी (सलीम पिंजारी)

फैजपूर येथील तापी परिसर विद्या मंडळ संचलित धनाजी नाना महाविद्यालय फैजपूर येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त दिनांक एक ऑक्टोबर रोजी स्वच्छांजली म्हणून स्वेच्छेने एक तास स्वच्छ्ता श्रम उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात आला. [ads id="ads1"]

  कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव, 18 महाराष्ट्र बटालियन एन सी सी जळगाव व महाविद्यालयाच्या अंतर्गत कॉलिटी अशूरंस सेल (आय क्यू ए सी ) यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार  दिनांक एक ऑक्टोबर ते सात ऑक्टोबर दरम्यान स्वच्छता सप्ताह साजरा होत आहे.  यानिमित्त महाविद्यालयातील विद्यार्थी विकास विभाग,  राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्र सेना, क्रीडा विभाग, यांच्यासहित कला, शास्त्र व वाणिज्य पदवी व पदव्युत्तर विभागांच्या माध्यमातून एक तास स्वच्छतेसाठी उपक्रम राबविले जात आहेत.[ads id="ads2"]

 याच अनुषंगाने आज दिनांक 3 ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय छात्र सेनेच्या माध्यमातून महाविद्यालय परिसराला प्लास्टिक मुक्त स्वच्छ महाविद्यालय करण्याच्या हेतूने स्वच्छता अभियान राबविण्यात आले.

 या अभियानाची सुरुवात महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ ए आय भंगाळे यांच्या मार्गदर्शनाने झाली. याप्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य तथा मानसशास्त्र विभाग प्रमुख डॉ एस व्ही जाधव, क्रायटेरिया हेड तथा हिंदी विभाग प्रमुख डॉ कल्पना पाटील, एनसीसी अधिकारी कॅप्टन डॉ राजेंद्र राजपूत, व कॅडेट्स मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 याप्रसंगी प्रभारी प्राचार्य डॉ ए आय भंगाळे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्व व त्यातून मिळणारा आनंद, आरोग्य व समाधान अद्वितीय असल्याचे प्रतिपादन केले व सर्वांच्या सहकार्याने व सहयोगातून महाविद्यालयाला स्वच्छ सुंदर महाविद्यालय बनविण्यासाठी आवाहन केले. यावेळी उपस्थित एनसीसी कॅडेट्सने महाविद्यालयातील विविध ठिकाणातील प्लास्टिक, कचरा व गवत जमा करून पर्यावरणाला पूरक होईल अशा रीतीने कचऱ्याची विल्हेवाट लावली.

 या स्वच्छता अभियानाला यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ ए आय भंगाळे, 18 महाराष्ट्र बटालियन एनसीसी जळगावचे समादेशक अधिकारी कर्नल अभिजीत महाजन, आय क्यू ए सी चेअरमन डॉ हरीश नेमाडे, क्रायटेरीया हेड डॉ कल्पना पाटील, क्रायटेरिया हेड डॉ ताराचंद सावसाकडे, क्रायटेरिया हेड डॉ हरीश तळले, कॅप्टन डॉ राजेंद्र राजपूत यांच्यासहित सीनियर अंडर ऑफिसर गणेश चव्हाण, सिनिअर अंडर ऑफिसर योगेश कचरे, ज्युनिअर अंडर ऑफिसर राजेश पाटील, कॅडेट केतन इंगळे, कॅडेट कृष्णा भावसार, कॅडेट विशाल बोदडे , कडेट सर्वेश बोदडे यांनी परिश्रम घेतले.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!