ट्रॅक्टर,मोटरसायकली चोरी प्रकरणात १८ आरोपींना अटक : १ दिवसाची पोलीस कोठडी

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

१३ मोटरसायकली जप्त

परराज्यात सुद्धा चोरट्यांची करामत

यावल पोलिसांची कौतुकास्पद मोठी कारवाई

यावल (सुरेश पाटील) यावल येथील ट्रॅक्टर व मोटरसायकल चोरी प्रकरणात यावल शहरातील एकूण १८ जणांना पोलिसांनी अटक करून १३ मोटरसायकली जप्त केल्या,जप्त केलेल्या मोटरसायकली पैकी २ मोटरसायकली पर राज्यातील असल्याने चोरट्यांनी इतर परराज्यात सुद्धा चोरीची करामत केल्याचे उघडकीस आले आहे,मोटरसायकली व ट्रॅक्टर चोरीच्या प्रकरणात एकूण १८ जणांना अटक करून कारवाई केल्याने यावल पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.[ads id="ads1"]

        याबाबत सविस्तर माहिती अशी की यावल येथील कुंभार वाड्यातील अजय मुलचंद पंडित वय ३० याने  फिर्यादीत नमूद केले आहे की दि.१४ सप्टेंबर २०२३ रोजी संध्याकाळी १८ वाजेपासून तर दि.१६ सप्टेंबर २०२३ रोजी दुपारी १:३० वाजेच्या दरम्यान यावल येथील कुंभार टेकडी तसेच जाकीर हुसेन रोडवर फुलचंद रामचंद्र यांच्या घराचे समोरून स्वराज कंपनीचे, निळ्या रंगाचे 75 हजार रुपये किंमत असलेले ट्रॅक्टर क्र.एम.एच.२८डी ९८८७ चोरून नेले आहे त्यानुसार यावल पोलिसांनी चौकशी तपास करून आरोपीस अटक केली असता ट्रॅक्टर व मोटरसायकल चोरीचे मोठे जाळे ( रॅकेट ) उघडकीस आणले.[ads id="ads2"]

        एकूण १८ संशयित आरोपींना अटक 

१)अशरफ उर्फ गोलू कलीदर तडवी १९ रा.बोरावल गेट यावल

२) अर्जुन सुरेश कुंभार १९ बोरावल गेट यावल

3) जावेद खान अफजल खान २२ रा.बाबानगर यावल.

४) सागर उर्फ उमेश जितेंद्र सपकाळे २७ बाहेरपुरा यावल  

५) देविदास उर्फ साहिल लतेश बारसे १६ बोरावल गेट ( यास विधी संघर्ष बालक असल्याने सीआरपीसी  ४१ ( १) प्रमाणे नोटीस देण्यात आली )

६) जावेद खान नजोर खान ३० ख्यांजानगर यावल.

७) रविंद्र पंढरी कोळी ४० दहिगांव

८) सलीम खलील तडवी २४   विरावली

९) विशाल दिलोष वाणी ३० फिल्टर हाऊस यावल.

१०) विनोद दोलत कुंभार २४   गायत्रीनगर पावल

११) उमेश झग्गु घारू ४९ फिल्टर हाऊस बोरावल गेट

१२) संजय भगवान भोई ३० बोरावल गेट

१३) हर्षल सदानंद गजरे २० फिल्टर हाऊस बोरावल गेट यावल.

१४) रविंद्र सुरेश कुंभार२५  कुंभारवाडा यावल

१५)आकाश राजु कुंभार १९ कुंभारवाडा

१६)सुरेश आनंदा कुंभार ५२  बोरावल गेट यावल

१७)सर्फराज समशेर तडवी २२ बोरावल गेट

18) राजेंद्र कळू महाजन ३८  यावल यांना यावल पोलिसांनी काल शनिवार दि.१४ रोजी रात्री २३:५४ वाजेच्या सुमारास अटक केली.

हेही वाचा :- तुमच्या प्लॉटचा,जमिनीचा नकाशा मिळवा दोन मिनिटात.....

हेही वाचा :- महसूल,पोलीस,आरटीओ यांच्या नाकावर टिचून परराज्यातील चोरीचे,बेकायदा जेसीबी मशीन यावल शहरात..?उद्योग धंद्यांमध्ये जोरदार चर्चा

        या प्रकरणात एकूण १३ मोटरसायकली जप्त करण्यात आल्या त्यापैकी सुरत, बऱ्हाणपूर, अमळनेर, व यावल एकूण ५ मालकांचा तपशील मिळाला आहे.

        थोडक्यात हकीकत - फिर्याद दिल्यानुसार अज्ञात आरोपीने फिर्यादीचे मालकेचे वरील वर्णनाचे व किमतीचे ट्रॅक्टर फिर्यादीच्या संमती वाचून लबाडीच्या इराद्याने चोरून नेले आहे वगैरे मजकूर चे फिर्याद दिल्यावरून गुन्हा दाखल आहे,

       या गुन्ह्याचा तपास सुरू असताना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून आरोपी क्र.१ ते ५ यांनी प्रस्तुत गुन्ह्यातील चोरीस गेलेले ट्रॅक्टर चोरून नेले असल्याचे समजून आल्याने सदर आरोपींना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी सदर दाखल गुन्ह्यातील चोरीस गेलेले ट्रॅक्टर काढून दिले आहे तसेच सदर आरोपींची अधिक सकल चौकशी केली असता त्यांच्याकडून आरोपी क्र.६ ते १८ यांचे ताब्यातून १३ मोटरसायकली जप्त केल्या आहेत.

      या अटक केलेल्या आरोपी सोबत सदर गुन्ह्यात अजून इतर आरोपी असण्याची दाट शक्यता यावल पोलिसांना आहे.  आरोपींना आज यावल येथील न्यायालयात प्रथम वर्ग न्यायाधीश एस.बी.वाळके यांच्यासमोर हजर केले असता आरोपींना एक दिवस पोलीस कोठडी सुनावली.

पोलिसांवर राजकारणाचा बिना बुडाचा दबाव आणि प्रभाव

चोरीच्या गुन्ह्यात एकूण १८ आरोपींना यावल पोलिसांनी अटक करून मुद्देमाल सुद्धा जप्त केल्याने पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे,परंतु संशयीत आरोपितांमध्ये राजकीय पक्षाचे काही समर्थक आणि हितचिंतक असल्याने राजकारणातून काही पदाधिकारी कार्यकर्ते आपल्या लोकप्रतिनिधीच्या प्रभावाखाली यावल पोलिसांवर दबाव आणि प्रभाव टाकून गुन्ह्यात पोलीस राजकारण करीत असल्याचा बिना बुडाचा आरोप पोलिसांवर करीत असल्याचे नागरिकांमध्ये बोलले जात आहे कारण चोरीच्या गुन्ह्यात सर्व स्तरातील संशयित आरोपी आहे पोलीस राजकारण करीत असल्याचा प्रश्न येतो कुठून..? याचे आत्मचिंतन राजकारणातील आरोप करणाऱ्यांनी करावे असे सुद्धा बोलले जात आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!