(सावदा प्रतिनिधी युसूफ शाह)
भुसावळ जिल्हा जळगाव येथे प्रोग्रेसिव्ह मायनारिटी वेलफेयर सोसायटी तर्फे पुर्व राष्ट्रपती ए.पी. जे अब्दुल कलाम व सर सय्यद अहमद खान यांच्या जयंती निमित्त एज्युकेशन कॉन्फरन्स चे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष महणुन जळगाव जिल्ह्यातील कॅन्सर तज्ञ डॉक्टर निलेश चांडक साहेब होते. प्रमुख वकते महणुन मुंबई येथील एम.बी.बी.एस डाॅ. रौशन जहां यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.[ads id="ads1"]
या कार्यक्रमांमध्ये जळगाव जिल्ह्यातील व राज्यातील शिक्षकांना व समाज कार्य करणाऱ्यांना डॉक्टरेट व आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले. तसेच रावेर तालुक्यातील जिल्हा परिषद उर्दू शाळा केह्राळे बु ता रावेर येथील पदवीधर शिक्षक गौस खान हबीबुल्ला खान यांना शैक्षणिक कार्यात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल आदर्श शिक्षक पुरस्काराने जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सन्माननीय आयुष प्रसाद साहेब यांच्या हस्ते मानचिन्ह , प्रशसती पत्र , पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. [ads id="ads2"]
गौस खान हे शरीआ शिक्षक पतपेढीचे संस्थापक अध्यक्ष , खानदेश पतपेढी रावेर येथे संचालक व महाराष्ट्र राज्य उर्दू शिक्षक संघटने मध्ये विभागीय सचिव या पदावर कार्यरत आहे.
हेही वाचा :- तुमच्या प्लॉटचा,जमिनीचा नकाशा मिळवा दोन मिनिटात.....
गौस खान यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याने रावेर तालुक्याचे आमदार शिरीष दादा चौधरी व मुकताईनगर चे आमदार चंद्रकांत पाटील , स्वामी फाउंडेशनचे अध्यक्ष रविंद्र पवार सर , कॄऊबा संचालक सै असगर संघटनेचे जिल्हा अध्यक्ष नफीस अहमद, असलम खान सर, पत्रकार फरीद शेख, मुजीबुर्रहमान सर यांनी कौतुक व अभिनंदन केले आहे.