फैजपूर प्रतिनिधी (सलीम पिंजारी)
फैजपूर येथील कळमोदा रोड, तहा नगर परिसरातील रस्ता. गटारी नसल्याने तहानगर परीसरात रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून गटारी नसल्यामुळे सांडपाणी रस्त्यावर साचत असून त्यामुळे घाणींचे साम्राज्य पसरत आहे, त्याच प्रमाणे रहिवासी संख्या बघता या ठिकाणी सांडपाणी, निचयासाठी पुरेशा गटारी सुद्धा नाहीत. याकडे नगर परिषद प्रशासनाकडून दुर्लक्ष होत आहे.[ads id="ads1"]
या परिसरात मस्जिद, व रुग्णालय (अल उमर हॉस्पिटल) असून येथे नेहमी नमाज पठनासाठी नागरिकांची व रुग्णांची नेहमी वर्दळ असते. तसेच काही नागरिकांनी आपल्या घरातील सांडपाणी हे गटारी नसल्याकारणाने रस्त्यांवर काढलेले आहे, त्यामुळे परिसरात दुर्गंधी युक्त पाण्यामुळे परिसरात डेंग्यू सदृश्य आजारांची शक्यता बळावत आहे, यामुळे परिसरात रुग्णांची संख्या वाढत आहे. [ads id="ads2"]
तरी महोदय आपणास विनंती कि. कळमोदा रोड तहानगर (अल उमर हॉस्पिटल परिसर ) या भागात आपण जातीने लक्ष घालून रस्ते व गटारी ची सुविधा नगरपरिषदेतर्फे करण्यात यावी अशी मागणी तहानगर भागातील रहिवासी मुस्तकीम खान सलीम खान मनियार यांच्यासह येथील नागरिकांनी निवेदनाद्वारे केली आहे.
हेही वाचा :- तुमच्या प्लॉटचा,जमिनीचा नकाशा मिळवा दोन मिनिटात.....