तापी पाटबंधारे विकास महामंडळ मुख्य अभियंता मुख्यालयात अनियमित हजर..?

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे



यावल(सुरेश पाटील)

जळगाव येथील तापी पाटबंधारे विकास महामंडळ अधिपत्याखालील मुख्य अभियंता हे आपल्या कार्यालयात आणि निवासस्थानी अनियमित राहत असल्याची तक्रार तापी पाटबंधारे विकास महामंडळाचे संचालक यांच्याकडे आज दि.१६ सप्टेंबर २०२३ रोजी करण्यात आली आहे.[ads id="ads1"]

        नशिराबाद येथील माहिती अधिकार कार्यकर्ता तथा सामाजिक कार्यकर्ता नितीन सुरेश रंधे यांनी तापी पाटबंधारे विकास महामंडळाचे संचालक यांच्याकडे दिलेल्या तक्रार अर्जात म्हटले आहे की. आपल्या तापी पाटबंधारे विकास महामंडळ अधिपत्याखालील मुख्य अभियंता हे आठवड्यातून फक्त २ ते ३ दिवस कार्यालयात उपस्थित राहतात कार्यालयीन दूरध्वनीवर संपर्क साधला असता उपलब्ध नसतात, त्यांनी काही ठराविक तक्रारदारांचे मोबाईल नंबर स्वतःच्या मोबाईल मध्ये ब्लॉक करून ठेवले आहेत त्यामुळे तक्रारदार माहिती अधिकार कार्यकर्ते यांना त्यांच्याशी संपर्क साधता येत नाही.[ads id="ads2"]

   त्यांचे जळगाव येथे निवासस्थान असताना ३५० ते  ४२५ किलोमीटर अंतरावरून ते ये, जा करीत असल्याने निवासस्थानी सुद्धा हजर राहत नाही निवासस्थानावर लाखो रुपये खर्च केला जात आहे. मुख्य अभियंता यांच्या दालनात सीसीटीव्ही कॅमेरे बसविल्यास कार्यालयात कार्यालयीन वेळेत ते स्वतः आणि इतर कर्मचारी किती वेळ उपस्थित राहतात..?

हेही वाचा :- तुमच्या प्लॉटचा,जमिनीचा नकाशा मिळवा दोन मिनिटात.....

हेही वाचा :- महसूल,पोलीस,आरटीओ यांच्या नाकावर टिचून परराज्यातील चोरीचे,बेकायदा जेसीबी मशीन यावल शहरात..?उद्योग धंद्यांमध्ये जोरदार चर्चा

 हे तापी पाटबंधारे विकास महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना,संचालक साहेबांना,नागरिकांना समजू शकेल,मुख्य अभियंता अनियमित उपस्थित राहत असल्याने त्यांच्या शासकीय/ खाजगी वाहनाला जीपीएस बसविल्यास शासकीय वाहन कोण चालवितो..? वाहनात कोण असतं..? वाहन कुठे आहे याचा सर्व तपशील समजू शकतो अशी तक्रार तापी पाटबंधारे विकास महामंडळाकडे करण्यात आल्याने संचालक काय कारवाई करतात याकडे संपूर्ण जळगाव जळगाव जिल्ह्याचे लक्ष वेधून आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!