नशिराबाद येथे शेकडो उपासक उपासिका यांनी घेतली धम्म दिक्षा

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे




जळगाव  (सुवर्ण दिप वृत्तसेवा) : नशिराबाद येथे भारतीय बौद्ध महासभा व व बौद्ध पंच मंडळ नशिराबाद यांच्या संयुक्त विद्यमाने. 67 वा धम्मचक्र प्रवर्तन महोत्सव दिनानिमित्त भव्य दीक्षा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते 14 ऑक्टोंबर 1956 विजयादशमी निमित्त नागपूर येथे येथे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जसे दीक्षा समारंभाचे आयोजन केले त्याच अनुषंगाने नशिराबाद येथे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाला बौद्ध धर्म गुरु भंन्ते सुमनतिसो महाथेरो यांच्या हस्ते तथागत गौतम बुद्ध व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.[ads id="ads1"]

  कार्यक्रमाचे अध्यक्ष भा.बौ.म. जिल्हा अध्यक्ष रवींद्र वानखेडे जिल्हा कोषाध्यक्ष शैलेंद्र जाधव जिल्हा सरचिटणीस आनंद ढिवरे    बी एस पवार, सुभाष सपकाळे, संस्कार विभागाचे जिल्हा सचिव तुषार रंधे व राजेंद्र इंगळे. गौरव वानखेडे. कृष्णा सदावर्ते. नशिराबाद बौद्ध समाजाचे अध्यक्ष विनोद रंधे प्रतिमा पूजन करून पुष्प वाहले.प्रस्तावना विनोद रंधे धम्मदीक्षा चे महत्व सांगितले कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या मनोगतामध्ये बौद्ध म्हणजे काय धम्म म्हणजे काय संघ म्हणजे काय याचे महत्त्व पटवून दिले बौद्ध धर्मगुरू  भंन्ते उपासक उपासिका यांना त्रिसरण पंचशील व 22 प्रतिज्ञा देऊन धम्माची दीक्षा दिली व सर्वांनी धम्माचे आचरण कसे असावे हे सांगितले.[ads id="ads2"]

या कार्यक्रमाला 500 हून अधिक उपासक उपासिका यांना देण्यात आली या कार्यक्रमाला मुलं मुली उपासक उपासिका यांनी पांढरे वस्त्र परिधान केले होते धर्मांतर केलेल्या सर्वांना प्रमाणपत्र वितरित करण्यात आले या कार्यक्रमाला बौद्ध पंच मंडळाचे सर्व पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते उपासक उपासिका हे उपस्थित होते.

शेवट खिर दान करून कार्यक्रमाचा समारोप करण्यात कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आनंद ढेरे यांनी केले आभार अनिल देवळे यांनी केले  शेवट सरणतय घेण्यात आले.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!