जळगाव(सुवर्ण दिप वृत्तसेवा) : येथील खोटे नगरात वर्षावास मासामध्ये धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्ताने अंधश्रद्धा निर्मूलन आणि चमत्कार सादरीकरणाचा कार्यक्रम आनंद ढिवरे आणि सुभाष सपकाळे यांनी घेतला. या कार्यक्रमांमध्ये समाजात असलेल्या अनिष्ट रूढी, परंपरा आणि समाजविघातक व्यसनाधीनता यावरही मार्गदर्शन करण्यात आले. सर्वप्रथम सुभाष सपकाळे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.[ads id="ads1"]
यानंतर व्यसनाधीनता या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. नंतर आनंद ढिवरे यांनी वेगवेगळ्या प्रयोगाच्या माध्यमातून चमत्कारांचे सादरीकरण केले. या प्रयोगांमध्ये प्रामुख्याने पाण्यावर दिवा पेटवणे, मंत्राने अग्नी प्रज्वलित करणे, हवेतून काळे धागेदोरे काढणे, हवेतून पैसे काढणे, लोकांच्या मनातील गोष्ट ओळखणे, चिठ्ठीवर लिहिलेला मजकूर चिट्ठी न उघडता सांगणे, गडू मध्ये भूत उतरविणे, तांब्या मधून आपोआपच पाणी काढणे चमत्कार सादरीकरणाचे प्रयोग करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. बी एस पवार यांनी केले.


